Home Breaking News Chandrapur city@ news • आज चंद्रपूरात निघतोय भव्य जनआक्रोश मोर्चा! •...

Chandrapur city@ news • आज चंद्रपूरात निघतोय भव्य जनआक्रोश मोर्चा! • मणिपूर येथील घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी मोर्चात स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हा आयोजकांचे आवाहन!

220

Chandrapur city@ news

• आज चंद्रपूरात निघतोय भव्य जनआक्रोश मोर्चा!
• मणिपूर येथील घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी मोर्चात स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हा आयोजकांचे आवाहन!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:मणिपूर येथे महिलांची नग्न धिंड काढून त्यांचेवर लैंगिक अत्याचार करुन त्यांची हत्या केल्याची घटना घडलेली आहे .तेथील क्रूर समुदायाने मागील तीन महिन्यांपासून असहाय जनतेवर अत्यंत क्रूर हल्ले करुन निष्पाप बालकां व महिलांसह शेकडो लोकांची अमानुषपणे हत्या केली आहे .अन्याय क्रूर अत्याचाराचे सत्र आजतागायत सुरूच आहे. राज्य व केंद्र सरकार हे सर्व अत्याचार सत्र उघड्या डोळ्यांनी बघत आहे. ह्या अमानुष अत्याचार मालिकेचा व त्यांच्या पाठीराख्यांचा निषेध करण्यासाठी चंद्रपूर शहरातील स्थानिक गांधी चौकातून उद्या सोमवार दि.२४जूलैला एका भव्य जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.या जनमोर्चात चंद्रपूरकरांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.सदरहु भव्य आक्रोश मोर्चा शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी थेट मुख्य मार्गाने निघून तो चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचणार आहे.