Ballarpur taluka@ news
• शेतकऱ्यांचे प्रधानमंत्री पीक विमा योजनेत नाव समाविष्ट कर:राजु झोड़े
✍️संजय घुग्लोत
सुवर्ण भारत:उपसंपादक
बल्लारपुर:बल्लारपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रधानमंत्री पीक विमा योजनेत नाव समाविष्ट करा अशी मागणी उलगुलान संघटनेच्या वतीनं करण्यात आले असून बल्लारपूर तहसीलदारांना संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांच्या नेतृत्वात मंगळवारी निवेदन देण्यात आले आहे.यावेळी अनेक शेतकऱ्याची उपस्थिती होती.
बल्लारपूर तालुक्यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी असून प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे अर्ज भरण्यास गेल्यास शेतकऱ्यांचे कागदपत्रे बाद करण्यात येत आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.तसेच सर्वे क्रमांक टाकल्यास शेतकऱ्यांच्या मोबाइल वर एसएमएस येत नसून नॉट रेकॉर्ड असा एसएमएस येत आहे.त्यामुळं परिसरातील अनेक शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजने पासून वंचित राहत असून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
दरम्यान याची माहिती शेतकऱ्यांनी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांना दिली.त्यांनी लगेच शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेता थेट शेतकऱ्यांना तहसिल कार्यालय गाठत तहसीलदारांना जाब विचारला.त्यानंतर बल्लारपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे नाव प्रधानमंत्री पीक विमा योजनेत समाविष्ट करण्याची मागणी केली.मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलनाच्या इशारा उलगुलान शेतकरी संगठना च्या राजु झोडे, श्याम झिलपे,रवि वनकर, राजकुमार शर्मा, राजेन्द्र पाल,विठोबा काळबांधे, संजय कुशवाह, महिपाल आर्या,विरु यादव,लोकानी दिली.
