Home Breaking News प्रणिता कांबळेंना सामाजिक व प्रशासकीय कार्यगौरव पुरस्कार जाहीर!

प्रणिता कांबळेंना सामाजिक व प्रशासकीय कार्यगौरव पुरस्कार जाहीर!

73

प्रणिता कांबळेंना सामाजिक व प्रशासकीय कार्यगौरव पुरस्कार जाहीर!

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

बीड राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ आणि श्रावस्ती सामाजिक, शैक्षणिक, संशोधन प्रतिष्ठान परळी वैजनाथ यांच्या वतीने सामाजिक,शैक्षणिक, पत्रकारिता अश्या विविध क्षेत्रात उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य
करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येतो. या पुस्कारांमध्ये या पूर्वी अनेक पुरस्कारप्राप्त झालेल्या
बार्टी सोलापूरच्या प्रकल्प अधिकारी प्रणिता कांबळे यांना सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल सामाजिक, प्रशासकीय कार्य गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. सोलापूर
जिल्ह्यातील असणा-या प्रणिता कांबळे यांना राज्यस्तरीय सामाजिक कार्य गौरव पुरस्कार
जाहीर झाल्याची माहिती पुरस्कार समितीचे अध्यक्ष संतोष जाधव यांनी दिली.

यापूर्वी देखिल त्यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. विविध वृत्तपत्रात त्यांनी विपूल लेखन केले आहे. त्यांचा अनेक कार्यात व उपक्रमात सहभाग राहिला आहे.
प्रणिता कांबळे यांना या वर्षात अनेक पुरस्काराने सन्मानीत
करण्यात आले आहे, त्यात राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराचा समावेश आहे.
प्रणिता कांबळे ह्या बार्टीच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवित असतात. त्यात त्यांचा मोलाचा वाटा असतो.
दरम्यान त्यांना राज्यस्तरीय सामाजिक, प्रशसकीय
कार्य पुरस्कार सन्मान जाहीर झाल्याबद्दल महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं गृपच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे, अधिवक्ता मेघा धोटे, किरण साळवी, रंज्जू मोडक वर्षा कोंगरे , संगिता पाटील सरोज हिवरे, मंथना नन्नावरे, विजया तत्वादी, स्मिता बांडगे रजनी रणदिवे, पायल दुपारे, रश्मी पचारे, कु.अर्चना सुतार, अस्मिता क-हाडे, नंदिनी लाहोळे, सायली टोपकर आदींनी प्रणिता कांबळे यांचे अभिनंदन केले आहे.