Home Breaking News Chandrapur dist@ news • सुंदर माझे उद्यान -ओपन स्पेस स्पर्धा ! •...

Chandrapur dist@ news • सुंदर माझे उद्यान -ओपन स्पेस स्पर्धा ! • स्पर्धेला मिळतोय उत्तम प्रतिसाद,योग नृत्य परिवारचाही स्पर्धेत सहभाग!

117

Chandrapur dist@ news
• सुंदर माझे उद्यान -ओपन स्पेस स्पर्धा !
• स्पर्धेला मिळतोय उत्तम प्रतिसाद,योग नृत्य परिवारचाही स्पर्धेत सहभाग!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:गत वर्षी प्रमाणे या वर्षी देखील चंद्रपूर महानगरपालिकाच्या वतीने सुंदर माझे उद्यान -ओपन स्पेस ही स्पर्धा घेण्यात येत आहे.दरम्यान होवू घातलेल्या या स्पर्धेत शहरातील 60 पेक्षा अधिक संघ सहभागी झाले आहेत.या स्पर्धेच्या निमित्ताने सदैव जनसेवेसाठी तत्पर असलेल्या शहरातील ” योग नृत्य” या सुपरिचित संस्थेने पुढे येऊन शहरातील एकूण 11 जागेंची स्वच्छता करण्याचा संकल्प हाती घेतला आहे.दरम्यान स्थानिक कोहिनूर ग्राउंडला ऐतिहासिक वारसा मिळालेला आहे. परंतु सद्यस्थितीत त्या ठिकाणची अवस्था अत्यंत दयनीय आहे.

किल्ल्याच्या भिंतींवर मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे उगवली असून तेथे साप व विंचूचे प्रमाण देखील वाढले असल्याचे दृष्टीक्षेपात पडते .या स्थळी मॉर्निंग वॉकला येणा-या लोकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येते. शहरातील मध्यभागी असलेला हा परिसर स्वच्छ व सुंदर करून तो लोकोपयोगी यावा हिच महानगर पालिका आणि चंद्रपूर शहरातील योग नृत्य परीवारची अपेक्षा आहे. त्याच अनुषंगाने योग नृत्य परिवारचे जनक गोपाल मुंदडा यांच्या मार्गदर्शनात व मुग्धा तरुण खांडे यांनी कोहिनूर ग्राउंड मध्ये आज पासून स्वच्छता अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. मागे पार पडलेल्या स्पर्धेत याच संघांनी एक लक्ष व पंचवीस लक्ष रुपयांचे विकासकामासाठी ठेवण्यात आलेले प्रथम पारितोषिक पटकाविले होते .त्यामुळे या वर्षी देखील या संघा कडून स्थानिक जनतेच्या अपेक्षा अधिक वाढलेल्या आहेत .

गोपाल मुंदडा यांनी संघातील सगळ्यांचा श्रमदान करून ग्राउंडची स्वच्छता आणि सौंदर्यीकरण करण्या करिता उत्साह वाढविला असून तनमनाने संघ प्रमुख मुग्धा खांडे यांनी व यांच्या संपूर्ण टीमने आज पासून पुढील एक महिन्यासाठी श्रमदान करून कोहिनूर ग्राउंड स्वच्छ व सुंदर बनविण्याचा संकल्प आखला आहे.हे येथे विशेष उल्लेखनीय आहे.