Home Breaking News Chimur taluka@ news • राष्ट्र सेवा दल चिमूरच्या वतीने मणिपूर येथील...

Chimur taluka@ news • राष्ट्र सेवा दल चिमूरच्या वतीने मणिपूर येथील अत्याचाराचा निषेध !

110

Chimur taluka@ news

• राष्ट्र सेवा दल चिमूरच्या वतीने मणिपूर येथील अत्याचाराचा निषेध !

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चिमूर:मणिपूर येथे हजारों लोकांच्या गर्दीने दोन स्त्रियांवर अमानुषपणे अन्याय व अत्याचार केला.ज्यामुळे संपूर्ण जगात देशाची मान शरमेने खाली गेली आहे.या घटनेचा तसेच याला कारणीभुत घटकांचा २४ जुलैला राष्ट्र सेवा दल चिमूर तर्फे निषेध करून समाजकंठकांना कठोर शिक्षा देण्याचे निवेदन तहसिलदार यांचे मार्फत उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.
मणिपूर येथे मागील अनेक दिवसांपासून हिंसाचाराच्या घटना घडत आहे. तसा व्हिडिओ समाज माध्यमावर आल्याने सर्व स्तरातून त्याचा निषेध केल्या जात आहे.अशा घटनेने आणखी त्यास खतपाणी घातल्याने समाजात महिला सुरक्षितेला धोका निर्माण झाला आहे.महिला अत्याचारांचे प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.
माणुसकिला काळीमा फासणारा आणि निंदनिय अशा मनिपूरच्या घटनेचा राष्ट्र सेवा दलातर्फे तीव्र शब्दात निषेध करून सर्व आरोपींना तातडीने अटक करून त्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणीचे एक लेखी निवेदन तहसिलदार प्राजक्ता बुरांडे यांचे मार्फत उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.
निवेदन देताना राष्ट्र सेवा दलाचे जिल्हा कार्याध्यक्ष रावण शेरकुरे,सेवा मंडळ सदस्य सुरेश डांगे,कोषाध्यक्ष रामदास कामडी,इमरान कुरेशी, प्रल्हाद बोरकर,प्रकाश कोडापे, जितेंद्र सहारे,होमराज सिडाम,कैलास बोरकर,कवडू लोहकरे,भूपेंद्र गरमडे, सुशील नगराळे,प्रमोद तितरे,मनोज राऊत आदीं कार्यकर्ते उपस्थित होते.