Home Breaking News Ghugus city@ news • लाइट्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनी व लॉईड्स...

Ghugus city@ news • लाइट्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनी व लॉईड्स इनफिनिट फॉउंडेशन तर्फ़े वृक्षारोपण केले

212

Ghugus city@ news
• लाइट्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनी व लॉईड्स इनफिनिट फॉउंडेशन तर्फ़े वृक्षारोपण केले

✍️पंकज रामटेके
सुवर्ण भारत:उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस : लाइट्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड उद्योगा व लाइट्स इन्फिनिट फाउंडेशन द्वारे घुग्घुस परिसरातील दोन गावी वृक्षारोपण करण्यात आले. कंपनीतच्या परिसरातील उसगांव व म्हातारदेवी या गावातले सरपंच व ग्रामपंचायत सदस्य व नागरिक वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात असुन ग्रामपंचायत कार्यालयाच्या वाॅलकपाउंटच्या भोवताल वृक्षारोपण करण्यात आले.तसेच काही महिन्यापूर्वी उसगांव येथे बस्थानक नुतनीकरण करण्यात आले.

गावालगतच्या शिवारात विविध प्रजातींचे बरेच वृक्ष रोपट्यांचे रोपण करण्यात आले. उल्लेखनीय म्हणजे या उपक्रमात गावातील महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या,

यावेळी लाइट्स इन्फिनिट फाउंडेशनचे नम्रपाली गोंडाणे यांनी उपस्थितांना वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून देत वृक्ष हे मानवी जीवनात वृक्ष हे अत्यंत मोलाचे घटक असल्याचा संदेश दिला. झाडे जगली, तरच मानवी जीवन जगेल, असेही त्या म्हणाल्या.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दोन्ही गावातील सरपंच व ग्रामपंचायतीचे कर्मचारी आदींनी उत्तम सहकार्य केले. सरपंच यांचे वृक्षारोपन करणाऱ्या नागरिकांचे आभार मानून कार्यक्रमाबाबत समाधान व्यक्त केले.

यावेळी लाइट्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड उत्पादन उपाध्यक्ष गुणाकार शर्मा,उत्पादन प्रक्रिया प्रमुख रविंद्र शुक्ला, सीएसआर व्यवस्थापक तरूण केशवाणी, रतन मेडा लाइट्स इन्फिनिट फाउंडेशनचे नम्रपाली गोडाणे व दोन्ही गावातील सरपंच निवीता ठाकरे, संध्या पाटील व परिसरातील नागरिक उपस्थित होते.