Home Breaking News Chandrapur dist@ news • चंद्रपूर मतदार संघाच्या विकासासाठी 15 कोटी रुपयांचा निधी...

Chandrapur dist@ news • चंद्रपूर मतदार संघाच्या विकासासाठी 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर • आ.जोरगेवारांच्या प्रयत्नांना यश ,विविध विकासकामांना मिळणार गती

92

Chandrapur dist@ news
• चंद्रपूर मतदार संघाच्या विकासासाठी 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर
• आ.जोरगेवारांच्या प्रयत्नांना यश ,विविध विकासकामांना मिळणार गती

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:किरण घाटे

चंद्रपूर:चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या सततच्या पाठपूराव्याला यश आले असून चंद्रपूर मतदार संघातील विकासासाठी नगर विकास विभागाच्या वतीने १० तर समाज कल्याण विभागाच्या वतीने ५ असा एकून १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून मतदार संघातील विकासकामांना आता गती मिळणार आहे.
चंद्रपूर मतदार संघाच्या विकासकामांसाठी विविध विभागाअंतर्गत मोठा निधी आमदार जोरगेवार यांनी खेचून आणला आहे. या निधीतून मतदार संघातील विकास कामे प्रगतीपथावर आहे. यात ११ अभ्यासिक, व्यायमशाळा, समाज भवन यासह मुलभूत सोयी सुविधांंची कामे प्राधान्याने केली जात आहे. यासोबत या कामांना अधिक गतीमान करण्यासाठी विविध विभागातून निधी मिळविण्यासाठी आमदार जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. त्यात त्यांना यशही येत आहे.
नुकताच त्यांनी हिंग्लाज भवाणी वार्डाच्या विकासासाठी पाच कोटी रुपयांचा निधी खेचून आणला आहे. या निधीतुन सदर वार्डाचा कायापालट होणार आहे. येथे आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे. तर शहराच्या प्रमुख मार्गावर प्रवेश गेटसाठीही आमदार जोरगेवार यांनी निधी उपलब्ध करुन दिला आहे. पांदण रस्त्ते युक्त मतदारसंघ घडविण्याचा संकल्प त्यांनी केला असून यासाठीही मोठा निधी मिळावा म्हणून त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे.
दरम्यान त्यांनी नगर विकास विभागाच्या वतीने १० तर समाज कल्यान विभागाच्या वतीने ५ असा १५ कोटी रुपयांचा निधी मतदार संघाच्या विकासासाठी खेचुन आणला आहे. या निधीतून साडे तिन कोटी रुपये खर्च करुन रामनगर येथे भव्य अभ्यासिका व जिमचे बांधकाम करण्यात येणार आहे. १ कोटी रुपयातून वडगाव येथील कुणबी समाज मंदिराच्या जागेवर अभ्यासिकेचे बांधकाम करण्यात येणार आहे. शहरातील विविध ठिकाणी ११ जागेवर योगा शेडचे बांधकाम करण्यासाठी या निधीतील दिड कोटी रुपये खर्च केल्या जाणार आहे. भिवापूर येथील रस्त्यासाठी ७० लक्ष रुपये खर्च केल्या जाणार आहे. तर ८० लक्ष रुपये खर्च करुन बालाजी वार्ड येथील रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण केल्या जाणार आहे. विशेष म्हणजे पूर परिस्थिती उद्भवलेल्या राष्टवादी नगर, वृंदावन नगर आणि तुलसी नगर येथील विकासकामासाठी १ कोटी २० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासह शहरातील विविध विकासकामांसाठी सदर निधीतील पैसे खर्च केल्या जाणार असून या कामांमुळे जनसुविधेत वाढ होणार आहे.