Home Breaking News Jivti taluka @news • जिवती तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्गांच्या शेतातील पीकांचे नुकसान!

Jivti taluka @news • जिवती तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्गांच्या शेतातील पीकांचे नुकसान!

151

Jivti taluka @news
• जिवती तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्गांच्या शेतातील पीकांचे नुकसान!

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर: गेल्या तीन चार दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे जिवती तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसाच्या पाण्याने घरांचे व शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झालेले आहे. दरम्यान त्यांची पाहणी करण्यासाठी आज जिवतीचे तहसिलदार यांच्या सोबत या विभागाचे युवा नेते महेश देवकते यांनी प्रत्यक्ष जाऊन तालुक्यातील अनेक गावांची पाहणी केली .चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशाने त्वरित पंचनामे करून शेतकरी बांधवांना तातडीने मदत करण्याचे आदेश मंत्री महोदयांनी जिवतीचे तहसिलदार यांना दिले असल्याचे वृत्त आहे.