Home Breaking News Nagpur city@ news • विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन आपल्या हक्कासाठी पेटून उठले...

Nagpur city@ news • विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन आपल्या हक्कासाठी पेटून उठले पाहिजे : आरीकर

89

Nagpur city@ news
• विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन आपल्या हक्कासाठी पेटून उठले पाहिजे : आरीकर

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

नागपुर:या देशाच्या विकासात कुणबी समाजाचा फार मोठा वाटा आहे .परंतु स्वातंत्र्याच्या 75 वर्षा नंतर सुद्धा न्याय तर मिळालाच नाही पण संधी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली नाही. आणि म्हणून आपले हक्क व अधिकार मिळविण्यासाठी समाजातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन समाजाला आपल्या हक्काची व अधिकाराची जाणीव करून द्यावी. आपल्याला न्याय मिळाला नाही तर पेटून उठावे असे विचार चंद्रपूर येथिल जेष्ठ पत्रकार, दलित मित्र व आदिवासी सेवक डी. के. आरीकर यांनी व्यक्त केले.
ते नागपूर स्थित विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या सभागृहात खैरे कुणबी बहुउद्देशीय विचार मंच पश्चिम नागपूर द्वारा आयोजित केलेल्या गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा आणि जेष्ठ नागरिकांच्या सत्कार प्रसंगी एका कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी राष्टीय ओबीसी महासंघाचे कोषाध्यक्ष आणि खैरे कुणबी बहुउद्देशीय विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष गुणेश्वर आरीकर उपस्थित होते तर विशेष अतिथी म्हणून नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू सुभाष चौधरी, खैरे कुणबी समाज सुधारक संस्थेचे अध्यक्ष स्वप्नील मोंढे, सेवानिवृत्त न्यायाधीश अजयजी चापले, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी विजय चापले, बांधकाम व्यावसायिक निलेश महाजन कृष्णा निसार, डॉ. प्रदीप महाजन, मोहन डंभारे, सुनील मगरे आदिंची उपस्थिती लाभली होती. सदरहु आयोजित सत्कार सोहळ्यात विशेष अतिथी म्हणून बोलतांना नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू सुभाष चौधरी यांनी शिक्षणाचे महत्व सांगून नोकरीच्या मागे न लागता नोकरी देणारे व्हा असे विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष गुणेश्वर आरीकर यांनी खैरे कुणबी समाज संघटित झाल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही व आपले प्रश्न सुटणार नाही असे म्हणाले. कार्यक्रमाच्या आरंभी संत तुकाराम महाराज आणि राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.
यावेळी 10 वी व 12 वी प्रविण्य प्राप्त विद्यार्थी व समाजातील जेष्ठ नागरिकांचा सन्मान चिन्ह, सन्मान पत्र व पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खैरे कुणबी बहुउद्देशीय विचार मंच पश्चिम नागपूरचे महादेव वैद्य, कमलाकर बोरकुटे, प्रवीण चापले, करुणा शिंदे, सुषमा रडके, अनुप रडके, टेमराज माले, रामरतन देशमुख, मानकर साहेब, रमेश चौधरी, गिरीश कावळे, रमेश फलके, राजेश पिंपळे, गणेश उपाशे, योगेश कुत्तारमारे, दिलीप कोटमकर, राजेंद्र महाजन, दिगंबर शेंडे, नेमदास मस्के, अस्विन डोंगरे, रवी वैद्य, हरिभाऊ चौधरी, धानोरकर आदिंनी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुरेख संचालन आकाश टाले यांनी तर प्रास्ताविक मोहन डंभारे यांनी केले.उपस्थितीतांचे आभार सुनील मगरे यांनी मानले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.