Home Breaking News Bhadrawati taluka@news • शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त “जनसेवा...

Bhadrawati taluka@news • शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त “जनसेवा सप्ताह” सुरूच • तिसऱ्या दिवशी विधानसभा क्षेत्रातील आपदग्रस्तांना आर्थिक मदत

84

Bhadrawati taluka@news
•शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त “जनसेवा सप्ताह” सुरूच

•तिसऱ्या दिवशी विधानसभा क्षेत्रातील आपदग्रस्तांना आर्थिक मदत

✍️मनोज मोडक
सुवर्ण भारत:तालुका प्रतिनिधी,भद्रावती

भद्रावती : शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा वाढदिवस वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात “जनसेवा दिन सप्ताह” म्हणून साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत संपूर्ण आठवडाभर सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

आज (दि.२९) ला जनसेवा दिन सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभा क्षेत्रातील आपादग्रस्तांना आर्थिक मदत करण्यात आली.भद्रावती तालुक्यातील वाघेडा येथील मनोज टोंगे यांचे गोठ्याला आज (दि.२९) च्या रात्री एक वाजताच्या सुमारास आग लागली. सुदैवाने कोणतीही जिवित हानी झालेली नाही. गावकऱ्यांच्या अथक परिश्रमाने सुमारे चार तासात आग विझविण्यात आली. तसेच गोठयातील बैलजोडी सुखरुप वाचविण्यात यश आले. वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांना ही घटना कळताच रात्रीच वाघेडा येथे आपतकालीन मदत पोहचविण्यात आली. वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी वाघेडा येथे मनोज टोंगे यांची स्वत: वैयक्तीक भेट घेतली व वास्तविक परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांना तात्काळ मदत केली.

या प्रसंगी हनुमान टाले, मनोज कसारे, राकेश बोथले बंडु काकडे, प्रफुल थेरे, मंगेश भोयर व गावकरी मंडळी घटनास्थळी उपस्थित होते. सोबतच स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती वासुदेव ठाकरे, मिथुन खोब्रागडे, अक्षय बंडावार यांची घटनास्थळी उपस्थिती होती.

यावेळी वाघेडा येथील ग्रामस्थ सुरेश महादेव वराटे व देवराव गणपत टाले यांचे बैल अनुक्रमे सर्पदंशाने व विद्युत करंटने मृत्युमुखी पडले, हे समजल्यावर त्यांनासुध्दा तात्काळ आर्थिक मदत देण्यात आली. शिवसेना (उबाठा) वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तथा पक्षाच्या विचारधारेला प्रेरीत होवून पक्षप्रवेश सुरू

शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवासेनेचे प्रमुख तसेच माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विचारांशी प्रेरित होऊन भद्रावती तालुक्यातील बेलगाव(भु.), नेताजी नगर, विंजासन आणि गौतम नगर येथील युवकांनी व महिलांनी शिवबंधन बांधून शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश केला.

वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे यांच्या उपस्थितीत या तरुणांनी शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला आहे.

याप्रसंगी भद्रावती शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख व नगरसेवक नरेंद्र पढाल यांच्या नेतृत्वात बेलगाव(भू.) ग्रामपंचायत सदस्य नंदकिशोर गाडगे, शिवसेना उपशहर प्रमुख अरुण घुगुल यांच्या नेतृत्वात सचिन पाचभाई, सुनील पायघन, नरेश कचाटे, सुरज बावणे, विकास बावणे, कृष्णा मोहितकर, रामा टाले आणि भावना खोब्रागडे यांच्या नेतृत्वात व्यंकट रमण, सुरेश पेटकर, शामलता पेटकर अश्विनी टिकले, वनमाला टिकले यांचा शिवबंधन बांधून पक्षप्रवेश करण्यात आले.

या पक्षप्रवेश सोहळ्याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) महिला जिल्हा संघटिका नर्मदा बोरेकर, वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे,विधानसभा उपजिल्हाप्रमुख भास्कर ताजणे,विधानसभा समन्वयक वैभव डहाणे,विधानसभा संघटक मंगेश भोयर, तालुका प्रमुख नरेंद्र पढाल,भद्रावती शहरप्रमुख घनश्याम आस्वले, युवासेना भद्रावती तालुका अध्यक्ष राहुल मालेकर, प्रशांत कारेकर, रोहीत वाभिटकर,संतोष माडेकर, गोपाल सातपुते व पदाधिकारीसह शेकडो शिवसैनिकांची उपस्थिती होती.

वरोरा-भद्रावती शिवसेना (उबाठा) तर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन व स्वागत करण्यात आले आहे.