Home Breaking News Ballarpur city@ news • शालेय शिक्षणासोबतच सामाजिक शिक्षण देखील आवश्यक :डॉ.अभिलाषा...

Ballarpur city@ news • शालेय शिक्षणासोबतच सामाजिक शिक्षण देखील आवश्यक :डॉ.अभिलाषा गावतुरे

87

Ballarpur city@ news
• शालेय शिक्षणासोबतच सामाजिक शिक्षण देखील आवश्यक :डॉ.अभिलाषा गावतुरे

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

बल्लारपूर:शालेय शिक्षणासोबतच सामाजिक शिक्षण देखील आवश्यक व गरजेचे असल्याचे मत बालरोगतज्ञ डॉ .अभिलाषा गावतुरे यांनी व्यक्त केले त्या भूमिपुत्र ब्रिगेड व ओबीसी समन्वय समिती, बल्लारपूर द्वारा आयोजित संत तुकाराम महाराज सभागृहात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन बोलत होत्या.
या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून चंद्रपूरचे न्युरोसर्जन डॉ. प्रशिक वाघमारे हे उपस्थित होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ‘करिअरवाला’ या पुस्तकाचे लेखक विजय मुसळे हे प्रामुख्याने उपस्थित होते. केवळ पारंपारिक शिक्षण न घेता बदलत्या काळानुसार विविध क्षेत्रातील उपलब्ध संधी यावर विजय मुसळे यांनी सविस्तर व विस्तृत मार्गदर्शन केले . व करिअरच्या विविध वाटा मोकळ्या केल्या.
या प्रसंगी डॉ.पि.यु. जरीले अनिल वागदरकर व जेष्ठ पत्रकार वसंत खेडेकर उपस्थित होते.
सदरहु कार्यक्रमाचे प्रास्ताविक विवेक खुटेमाटे यांनी केले तर सुरेख संचालन रुपम निमगडे ह्यांनी केले, उपस्थितीतांचे आभार शुभांगी तिडके यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुधीर कोरडे, राजेश बट्टे, विश्वास निमसरकार, अमोल कोकडे,रंजित धोटे ,ईश्वर नेरडवार, आशिष निमसरकार ,कुनाल कौरासे यांनी परिश्रम घेतले.