Home Breaking News Ghugus city @news • दहा मोहरम (अशुरा) निमित्त काँग्रेस तर्फे सरबत वितरण

Ghugus city @news • दहा मोहरम (अशुरा) निमित्त काँग्रेस तर्फे सरबत वितरण

51

Ghugus city @news
• दहा मोहरम (अशुरा) निमित्त काँग्रेस तर्फे सरबत वितरण

✍️पंकज रामटेके
सुवर्ण भारत:उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घूस : इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर (स.अ) यांच्या मृत्यूच्या पन्नास वर्षानंतर करबला येथील गव्हर्नर यजीद याने स्वतःला खलिफा घोषित केले.

यजीद हा प्रचंड अत्याचारी व व्यभिचारी होता पैगंबर साहेबांचे नातू हजरत इमाम हुसैन यांनी यजीद याला खलिफा मानण्यास नकार दिला व आपल्या कुटुंबातील सदस्य व सहकारी मित्र परिवार ज्यात बाहत्तर लोग होते. ज्यात सहा महिन्याचे लहान बाळा पासून तर युवक व महिला देखील होते या सर्वांना घेऊन ते मक्केच्या दिशेने निघाले

यामुळे चिडलेल्या यजीदने आपल्या आठ हजार सैन्यांना घेऊन हजरत इमाम हुसेन विरुद्ध युद्ध पुकारला या युद्धात संख्येने अत्यंत कमी असलेल्या इमाम हुसेन यांच्या सैन्याचे अन्न – पाणी पूर्णतः बंद केले अत्यंत क्रूर पध्दतीने त्यांचा छळ केला
या युद्धात संपूर्ण बहात्तर लोक शहीद झाले व मोहरमच्या दहा तारखेला इमाम हुसेन यांना धोक्याने मारण्यात आले
हा दिवस अत्यंत दुःखाचा दिवस आहे.

मानवतेसाठी स्वतःच्या व कुटुंबाच्या जीवाची पर्वा न करता
अन्न – पाण्याशिवाय प्राणाचा त्याग करणाऱ्या हजरत इमाम हुसैन व त्यांच्या सहकार्याच्या आठवणीत आजच्या दिनी शोक व दुखवटा मध्ये व्यतित केल्या जातो या दीना निमित्त जागोजागी सरबत व पुलाव वितरण केल्या जाते.

शहर काँग्रेसच्या वतीने शहर अध्यक्ष राजुरेड्डी व पदाधिकाऱ्यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात निंबू सरबत वितरण करण्यात आले.

याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, अलीम शेख,सुधाकर बांदूरकर,शामराव बोबडे,रोशन दंतलवार,विशाल मादर,नुरुल सिद्दीकी,रोहित डाकूर,तिरुपती महाकाली,विजय माटला,देव भंडारी,आकाश चिलका,रफिक शेख,सुनील पाटील,साहिल सैय्यद,अरविंद चहांदे,कुमार रुद्रारप,कपील गोगला,दिपक पेंदोर,रंजित राखुंडे,सन्नी कुम्मरवार,अंजैय्या आकापाका,अंकुश सपाटे,हरीश कांबळे,व मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.