Home Breaking News Bhadrawati taluka@news • राज्य महामार्गाची दुरुस्ती होत नसेल तर नंदोरी टोल...

Bhadrawati taluka@news • राज्य महामार्गाची दुरुस्ती होत नसेल तर नंदोरी टोल नाका बंद करा • टोल व्यवस्थापक नंदोरी यांना आकाश वानखेडे यांचा निवेदनाद्वारे इशारा

93

Bhadrawati taluka@news
• राज्य महामार्गाची दुरुस्ती होत नसेल तर नंदोरी टोल नाका बंद करा
• टोल व्यवस्थापक नंदोरी यांना आकाश वानखेडे यांचा निवेदनाद्वारे इशारा

✍️मनोज मोडक
सुवर्ण भारत:तालुका प्रतिनिधी,भद्रावती

भद्रावती : आनंदवन ते आसिफाबाद या राज्य महामार्ग गेल्या काही महिन्यापासून जागोजागी उघडला आहे. त्यामुळे कित्येक अपघात होऊन जखमी तर काहींचा मृत्यू सुद्धा झाला आहे. या राज्य महामार्गाची दुरुस्ती करण्याची सर्वस्वी जबाबदारी नंदोरी टोल नाका यांची आहे परंतु दुरुस्तीच्या नावाखाली निकृष्ट दर्जाचे कामे केली जात असल्याने या महामार्गाची दुरुस्ती होत नसेल तर टोल नाका बंद करा असा इशारा भाजप जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आकाश वानखेडे यांनी डब्लू सी बी टी आर टोल प्लाजा व्यवस्थापक नंदोरी यांना निवेदनाद्वारे दिला आहे .
आनंदवन ते आसिफाबाद या द्विभाजक राज्य महामार्गाचे टोल वसुली व देखभाल दुरुस्तीचे काम डब्लू सी बी टी आर या टोल प्लाजा नंदोरी यांना देण्यात आला गेल्या काही महिन्यापासून या राज्य महामार्गावर कित्येक ठिकाणी मोठमोठे गड्डे पडले आहे तर काही ठिकाणी रस्ता दबला गेला आहे. हिवाळा व उन्हाळा गेल्यावर ऐन पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्याची डागडूची केली जात आहे. त्यामध्ये मोठी गिट्टी टाकली जात आहे मोठे वाहन आले की संपूर्ण गीट्टी रस्त्यावर पसरत आहे त्यामुळे छोटे-मोठे अपघात सुद्धा घडत आहे कित्येक जखमी झाले तर कित्येकांनी जीव सुद्धा गमावला आहे.
रस्त्याची डागडूची न करता त्या रस्त्याचे मजबुतीकरण करणे आवश्यकता आहे वरील सर्व परिस्थिती बघता योग्य पद्धतीने महामार्गाचे काम करण्यात यावे अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे आंदोलन करून टोल नाका बंद करू असा इशारा भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आकाश वानखेडे यांनी टोल प्लाझा व्यवस्थापक यांना निवेदनाद्वारे दिला आहे.