Home Breaking News Chandrapur dist@ news • नगरपरिषद भरती अर्ज भरताना MSCIT अनिवार्य असल्याची तांत्रिक...

Chandrapur dist@ news • नगरपरिषद भरती अर्ज भरताना MSCIT अनिवार्य असल्याची तांत्रिक अडचण दूर करा :सिद्धांत पुणेकर

111

Chandrapur dist@ news
• नगरपरिषद भरती अर्ज भरताना MSCIT अनिवार्य असल्याची तांत्रिक अडचण दूर करा :सिद्धांत पुणेकर

सुवर्ण भारत:पंकज रामटेके(उपसंपादक)

चंद्रपूर : राज्यात मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया चालू आहे. नगर परिषद भरती मध्ये अर्ज भरताना MSCIT अनिवार्य असल्याची बाब गेल्या १५ दिवसा पासून विभागांच्या लक्षात आणून देत असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. महाराष्ट्र शासनाच्या सेवेत दाखल घेण्यासाठी MSCIT अनिवार्य नसून सेवेत दाखल झाल्यानंतर दोन वर्षाचा आत देणे बंधनकारक आहे.
एमपीएससी, यूपीएससी, एसएससी अर्ज करताना अशा प्रकारचे बंधन घातले जात नसताना, नगरपरिषद भरतीत ही जाचक आणि अन्यायकारक अट टाकून नगरपरिषद विभाग नियमांना बगल देत आहे. 2003 आणि त्यानंतर निघालेल्या कोणत्याही शासन निर्णयाने २ वर्षाची अट काढून टाकलेली नाही. हेल्पडेक्स वर समाधानकारक उत्तर मिळत नाही हजारो मुलांचे MSCIT च्या कारणामुळे अर्ज प्रलंबित आहे. MSCIT अनिवार्य ही अर्जातील तांत्रिक अट काढून उमेदवारांना दिलासा देण्यात याव्या व बेरोजगारांना न्याय मिळवून द्यावा. वंचित बहुजन युवा आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष सिद्धांत पुणेकर यांनी नगर परिषद आयुक्त यांच्या कडे पत्राद्वारे अशी मागणी केली.