Home Breaking News Chandrapur city@ news • संभाजी भिडेंच्या विरुध्द शहर महिला काँग्रेसची चंद्रपूर पोलिस...

Chandrapur city@ news • संभाजी भिडेंच्या विरुध्द शहर महिला काँग्रेसची चंद्रपूर पोलिस स्टेशनला रिपोर्ट दाखल

117

Chandrapur city@ news
• संभाजी भिडेंच्या विरुध्द शहर महिला काँग्रेसची चंद्रपूर पोलिस स्टेशनला रिपोर्ट दाखल

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य करणारे श्री शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे उर्फ मनोहर कुळकर्णी यांच्या विरुध्द आज चंद्रपूर शहर पोलिस स्टेशनला शहर महिला काॅंग्रेसच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली.दरम्यान काँग्रेस पक्षाच्या जेष्ठ नेत्या माजी मंत्री तथा आ. यशोमती ठाकूर यांनी संभाजी भिडे यांना तात्काळ अटक व्हावी यासाठी अमरावती शहरात आंदोलन केले होते. हे सर्वश्रुतच आहे.त्या नंतर त्यांना ट्विटरवरून एका अज्ञात इसमाने जीवे मारण्याची धमकी दिली संभाजी भिडे व धमकी देणा-या त्या व्यक्तींवर तातडीने कारवाई व्हावी अशी महिला काँग्रेसची मागणी आहे.

आज याच संदर्भात स्थानिक पोलिस स्टेशनला रिपोर्ट देताना चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी,चंद्रपूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष चंदा वैरागडे , महिला काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकारी अश्विनी खोब्रागडे,ओबीसी विभाग प्रदेश सरचिटणीस प्राचार्य नरेंद्र बोबडे, ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष राहुल चौधरी ,माजी नगरसेविका विना खनके, सकिना अन्सारी,वंदना भागवत ,अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हाध्यक्ष निशा ढोंगळे, अल्पसंख्याक विभागाच्या महिला पदाधिकारी मुन्नी शेख ,महिला काँग्रेसच्या जयश्री जाधव ,सुवर्णा भारस्कर,अंजु वैरागडे ,लीला बुटले,तेजस्विनी पोडे, शीतल लेडांगे,यांचे सह महिला काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.