Home Breaking News Bhadrawati taluka@news • विविध उपक्रमांनी साजरी होणार संस्थापक मोरेश्वर टेमुर्डे...

Bhadrawati taluka@news • विविध उपक्रमांनी साजरी होणार संस्थापक मोरेश्वर टेमुर्डे यांची जयंती •विवेकानंद महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन

72

Bhadrawati taluka@news

• विविध उपक्रमांनी साजरी होणार संस्थापक मोरेश्वर टेमुर्डे यांची जयंती

•विवेकानंद महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन

✍️मनोज मोडक
सुवर्ण भारत:तालुका प्रतिनिधी,भद्रावती

भद्रावती : विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोरा या शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष स्व. ॲड. मोरेश्वर टेमुर्डे यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्त ४ ऑगस्ट, २०२३ रोज शुक्रवारला सकाळी १० वाजता स्थानिक विवेकानंद महाविद्यालयात वृक्षारोपण,वार्षिकांक ‘विवेक’ चे प्रकाशन,सोलर एनर्जी लॅबचे उद्घाटन इत्यादी उपक्रमांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोरा चे सचिव अमन टेमुर्डे असतील. प्रमुख अतिथी म्हणून लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष बळवंतदादा गुंडावार, सामाजिक कार्यकर्ते प्रा. धनराज आस्वले, प्रयोगशील उघोजक गिरीश पद्मावार प्रामुख्याने उपस्थित असतील. तरी प्रस्तुत कार्यक्रमांस नागरिक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नामदेव उमाटे, कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.अमोल ठाकरे यांनी केले आहे.