Home Breaking News Chandrapur dist@ news • अनिल डोंगरे यांची भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र...

Chandrapur dist@ news • अनिल डोंगरे यांची भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ति

61

Chandrapur dist@ news
• अनिल डोंगरे यांची भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ति

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

चंद्रपूर:अनिल डोंगरे यांच्या राजकीय व सामाजिक कार्याची दखल घेत पुनश्च एकदा भारतीय जनता युवा मोर्चा कार्यकारणीत पदोन्नती करून त्यांचे प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याची दखल घेत त्यांचे विचार अंगीकारून ते राजकारणात,समाजकारणात कार्य करू लागले त्यांच्या उल्लेखनीय कार्याची समाज व समाजातील काम करणारे नेते मंडळी त्यांचे कार्य टिपत गेले.नुकत्याच झालेल्या भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश कार्यकारणीत भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी आपल्या पत्रानुसार त्यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली. अनिल डोंगरे हे वयाच्या वीस वर्षापासून भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून एका छोट्या गावापासून ते तालुका ते प्रदेश याप्रमाणे उल्लेखनीय कार्य करून त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली. मागील भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश कार्यकारणीत प्रदेश सचिव तसेच गडचिरोली जिल्हा प्रभारी म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी होती. त्यांनी पक्षाच्या प्रत्येक जबाबदारी चांगले काम करून पक्ष संघटनेत आपल्या नावाचा ठसा उमटविला. तसेच राजकीय पक्षाच्या व्यतिरेक ते परमपूज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटनेत पंधरा वर्षापासून कार्यरत आहे. त्यांनी त्यांच्या व्यसनमुक्तीच्या कार्यात चंद्रपूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन हजारच्या संख्येने दारू व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांना व्यसनमुक्त केले.या संघटनेची मागील पाच वर्षापासून जिल्हाध्यक्षाची धुरा त्यांच्याकडे आहे. त्यांच्या व्यसनमुक्तीच्या कार्यासाठी महाराष्ट्र शासनाने 2017/18 च्या राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराने पुरस्कार देऊन सन्मानित केले. मागील पंधरा वर्षापासून विचोडा – चांदसुरला या तीन गावची ग्रामपंचायतची धुरा सरपंच,उपसरपंच म्हणून जवाबदारी त्यांच्या परिवारातील व्यक्ती व स्वतः त्यांच्याकडे आहे. यांच्या कार्याला पहुंन त्यांची पुन्हा एकदा भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली या निवडीबद्दल जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून अनिल डोंगरे यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे वने सांस्कृतिक कार्य मंत्री नाम.सुधीर मुनगंटीवार.भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हंसराज अहिर ओबीसी मागासवर्गीय राष्ट्रीय अध्यक्ष विक्रांत पाटील प्रदेश महामंत्री भाजपा राहुल लोणीकर,हरीश शर्मा जिल्हा अध्यक्ष भाजपा यांचे निवडीबद्दल आभार धन्यवाद मानले.