Home Breaking News Ghadchiroli dist@ news • कुसुम ताई अलाम यांचा अमरावतीत सत्कार

Ghadchiroli dist@ news • कुसुम ताई अलाम यांचा अमरावतीत सत्कार

334

Ghadchiroli dist@ news
• कुसुम ताई अलाम यांचा अमरावतीत सत्कार

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

गडचिरोली:आदिवासी युवा क्रांती दल व आदिवासी क्रांती नागरी सहकारी पतसंस्था अमरावती यांच्या कडून गुणवंतांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्यगण समाजाला एकत्रित करण्याचे काम करत असुन सतत विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात.सदरहु आयोजित कार्यक्रमात गडचिरोलीच्या सामाजिक कार्यकर्त्या कुसुम ताई अलाम यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी त्यांना पाच हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

गडचिरोली सारख्या अति दुर्गम भागात पहिले आदिवासी महिला साहित्य संमेलनाचे आयोजन करुन त्यांनी एक इतिहास घडविला होता.याच कार्यासाठी त्यांचा हा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा.पुरुषोत्तम कुमरे यांनी विभूषित केले होते तर कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून सह आयुक्त माधुरी मडावी लाभल्या होत्या.

या वेळी प्रामुख्याने तनुश्री धर्मरावबाबा आत्राम, डॉ. सिमा नैताम, जागृती कुमरे , डॉ .सुरज मडावी भिमराव खंडाते प्रा.संजीवकुमार सलामे ,रविंद्र सयाम आदीं उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामेश्वर इवनाते यांनी केले.तर संचालन पंकज वेराटे व सविता प्रशांत मडावी यांनी केले.कार्यक्रमात हिंमतराव उईके यांच्या शैक्षणिक विचार मंथन या पुस्तकाचे थाटात विमोचन करण्यात आले.