Home Breaking News Ballarpur city@ news • बल्लारपूरात मंडल यात्रेचे जंगी स्वागत • ओबीसी...

Ballarpur city@ news • बल्लारपूरात मंडल यात्रेचे जंगी स्वागत • ओबीसी जनगणना होणे गरजेचे-डॉ.ॲड. अंजली साळवे

148

Ballarpur city@ news
• बल्लारपूरात मंडल यात्रेचे जंगी स्वागत
• ओबीसी जनगणना होणे गरजेचे-डॉ.ॲड. अंजली साळवे

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

बल्लारपुर:ओबीसी,व्हिजेनटी,एसबीसीच्या जनजागृती अभियाना अंतर्गत विदर्भात सात जिल्ह्यात मंडल यात्रेला सुरुवात झालेली आहे.दरम्यान
ओबीसींच्या विविध मागण्या व जनजागृती साठी नागपूरहून निघालेली ही मंडल यात्रा नुकतीच कळमना,बामणी मार्गे बल्हारपूर शहरात दाखल झाली .

कळमना येथे सतीश बावणे ,झाडे, अमीत नळे सरपंच प्रल्हाद आलम, उपसरपंच सुभाष ताजणे,राजेश भट्टे,गणपती मोरे या शिवाय बल्लारपूर नगरीतील ओबीसी समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या मंडल यात्रेचे जंगी स्वागत केले. या वेळी ज्येष्ठ समाजसेविका डॉ.रजनी हजारे ,चेतन गेडाम, अध्यक्ष अधिवक्ता प्रणय काकडे,नागेश रत्नपारखी ,अनिल वागदरकर प्रभाकर मुरकुटे आदीं उपस्थित होते.
बल्लारपूर शहरात मंडल यात्रेच्या स्वागतासाठी एक बाईक रॅली काढण्यात आली. या वेळी जय भीम चौक व विजय स्तंभाजवळ मंडल यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले. जय भीम बहुउद्देशीय संस्थाचे अध्यक्ष संतोष बेताल, देवराव मेश्राम ,कवाडे या वेळी प्रामुख्याने हजर होते.
रमाबाई चौकात आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष रवी कुमार पुप्पुलवार,अफजल अल्ली, ज्योती बापरे यांनी या यात्रेचे स्वागत केले.
बल्लारपूर शहरात मंडळ यात्रेचा स्वागत समारोह शासकीय विश्रामगृहात पार पडला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सूर्यकांत साळवे यांनी विभूषित केले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अंजली साळवे,उमेश कोराम,ऍड पुरुषोत्तम सातपुते,प्रा.अनिल डहाके उपस्थित होते.
ओबीसी जनगणना ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे परंतु केंद्र सरकार जर ओबीसी जनगणना करत नसेल तर ती राज्याने करावी.कारण ओबीसीचा आकडाच जर सरकार जवळ नसेल तर ओबीसीच्या कल्याणकारी योजना,ओबीसी आरक्षण असे मुद्दे सरकार कोणत्या आधारावर हाताळत आहे हा प्रश्न नेमका पडतो ,असे स्पष्ट मत ओबीसी जनगणना व या अभियानाच्या प्रणेत्या डॉ. ऍड .अंजली साळवे यांनी या सभेत बोलताना व्यक्त केले.
ओबीसी विद्यार्थ्यांना स्वाधार योजना सुरू झाल्या पाहिजे, सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांना शंभर टक्के फी माफी,महाज्योत संस्थेला १००० कोटी रुपयांची निधी ,इतर मागास आर्थिक विकास मंडळाला १०००कोटी रुपयांचा निधी तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागाद्वारे सर्व जिल्ह्यात स्वतंत्र कार्यालय ओबीसी वसतिगृह अश्या अनेक मागण्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले .जनजागृतीसाठी ही यात्रा असून मंडल यात्रा टप्प्या टप्प्याने विदर्भातील जिल्हे व तालुके फिरणार असल्याचे मंडल यात्रेचे संयोजक उमेश कोराम यांनी सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश कडू यांनी तर आभार प्रदर्शन विवेक खुटेमाटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुधीर कोरडे,शंकर काळे,अमोल काकडे, रणजीत धोटे,अंकित निवलकर,चंद्रशेखर भेंडारकर यांनी अथक परिश्रम घेतले.