Home Breaking News Chandrapur city@ news • नोंदणीकृत फेरफार रुजू करण्यासाठी “यांना” हवी होती लाच...

Chandrapur city@ news • नोंदणीकृत फेरफार रुजू करण्यासाठी “यांना” हवी होती लाच ! •तक्रारदाने केली तक्रार: एसीबीने दिला दणका! • मंडळ अधिकारी सुनील चौधरी व लाचखोर तलाठी राजू रग्गड अडकले लाचलूचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात! • चंद्रपूर ACB ची धडक कारवाई! •विदर्भात उडाली खळबळ! •जनतेंनी केले कारवाईचे स्वागत!

304

Chandrapur city@ news
• नोंदणीकृत फेरफार रुजू करण्यासाठी “यांना” हवी होती लाच !
•तक्रारदाने केली तक्रार: एसीबीने दिला दणका!
• मंडळ अधिकारी सुनील चौधरी व लाचखोर तलाठी राजू रग्गड अडकले लाचलूचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात!
• चंद्रपूर ACB ची धडक कारवाई!
•विदर्भात उडाली खळबळ!
•जनतेंनी केले कारवाईचे स्वागत!

सुवर्ण भारत:किरण घाटे(उपसंपादक)

चंद्रपूर:नोंदणीकृत फेरफार रुजू करण्यासाठी एक दोन हजारांची नव्हे तर चक्क १५हजार रुपयांची लाच मागणा-या एका लाचखोर तलाठ्यास व मंडळ अधिकाऱ्यास चंद्रपूर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी व पथकांनी नुकतेच रंगेहात पकडल्याचे वृत्त आहे.कायद्याने लाच घेणे व देणे हा गुन्हा आहे याची पुरेपूर कल्पना असतांना देखिल शासनाचा महिण्याकाठी गलेलठ्ठ पगार उचलणा-या या दोघांना लाचेचा मोह टाळता आला नाही .शेवटी ते लाच घेताना चंद्रपूर एसीबीच्या जाळ्यात अलगद अडकले !या लाचखोरांचे नांवे अनुक्रमे अशी आहे सुनिल महादेव चौधरी (मंडळ अधिकारी) व राजू विठ्ठल रग्गड( तलाठी )!राजू रग्गड यांचे कडे अतिरिक्त अडेगांव देशमुख या गावाचा कार्यभार होता .तर चार महिण्यां पूर्वी सुनिल चौधरी यांना पदोन्नती मिळाली होती.ते गोदेंडा या नविन महसूल मंडळाचा कार्यभार सांभाळत होते. तक्रार दार हे सेवानिवृत्त कर्मचारी होते ते आपल्या परिवारासह अतिदुर्गम गडचिरोली भागात राहत होते.त्यांच्या कुटूंबातील शेतजमीन चिमूर तालुक्यातील अडेगांव देशमुख या गावी आहे.या शेतजमीनीवर काही नांवे समाविष्ठ होती .

आत्यांनी विनामोबदला लेख दुय्यम निबंधक कार्यालय चिमूर येथे लिहून दिला होता.नंतर तक्रारदाराने तो लेख फेरफार करण्यासाठी विहीत नमुन्यात पटवा-याकडे अर्ज सादर करून दिला होता .पण पटवारी मात्र फेरफार करण्यासाठी सतत लाचेची मागणी करत होता.पटवा-याने या कामासाठी तब्बल १५ हजार रुपयांची मागणी केली.पटवारी व तक्रारदार यांचेत बोलत चालत तो सौदा ११हजार रुपयांवर आला.पण तक्रारदारास ही रक्कम मुळातच देण्याची इच्छा नव्हती. त्याने थेट चंद्रपूर गाठले व पटवारी व मंडळ अधिकारी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.एसबीच्या अधिका-यांनी व पथकांनी क्षणाचा विलंब न लावता सापळा रचला.
चिमूरला लाचखोर राजू रग्गड यांचे किरायाचे निवासस्थान आहे.त्याच ठिकाणी चंद्रपूर लाचलूचपत पथकांनी यशस्वीपणे ही धडक कारवाई केली.घटनेची माहिती होताच चिमूरसह अख्ख्या विदर्भात एकच खळबळ उडाली.रग्गड हे ब-याच वर्षांपासून चिमूर उपविभागात पटवारी म्हणून कार्यरत आहे.दरम्यान लाचखोर तलाठी रग्गड व मंडळ अधिकारी चौधरी यांचेवर उपरोक्त कारवाई नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, अप्पर पोलिस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक मंजूषा भोसले ,चंद्रपूर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक प्रशांत पाटील, एसीबी पथकातील कर्मचारी रोशन चांदेकर ,संदेश वाघमारे, ‌वैभव गाडगे ,पुष्पा काथोळे, सतिश शिडाम आदींनी यशस्वीरित्या केली.

चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी वर्गात सध्या या घटनेची एकच चर्चा ऐकावयास मिळत आहे.उपरोक्त धडक कारवाईचे जनतेंनी स्वागत केले आहे.