Home Breaking News • तुझी भूमिका काय ?

• तुझी भूमिका काय ?

142

तुझी भूमिका काय ?

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

◽🔸◽आक्रोश बुडवत राहतो
कोण चहाच्या पेल्यात
कोण सिगारेटच्या धूरात

हे बळ
संस्कृती नावाचं
नळकांडे धूपवत ठेवणारं

ज्याची त्याची
शिरजोरी..

एकेरी, दुहेरी
जमावाची कुरघोडी..

पहाटेचा घंटानाद
कुणाचे हाताने साकडे
आपापल्या श्रद्धांवर
वेगळीच चूल
प्रेमाचा कट्टर महापूर

ठिणग्या
कोटाच्या खिशात
कुठे हात फिरवलेल्या
मिशांत…

गरिबांचा खिसा
फाटका..

नियमानं
चुली पेटत नाहीत
जमाव पेटतो कसा?

आक्रोशही आता
सरावलेला
निपचित पडून राहीलेला

माणूस नाहीच…
नरांचा काळ
सोकावलेला..

या कारभा-यांनी
ठरवलेल्या नितींचे
ठोकताळे पूजणा-या..

चार , दोन
एक
न फुटता रक्ताळलेल्या
कवठ्या रस्त्यावर..
सहन होत नाही म्हणून..

बाकी जिवंत प्रेतांचे
पंचनामे
झालेच पाहीजेत…

◽◼️मृणाल कांबळे,सहज सुचलं सदस्य चंद्रपूर☘️