Korpna taluka@ news
•अंतरगाव येथे आधिवासी दिन मोठया उत्साहात संपन्न
✍️मंगेश तिखट
विशेष जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
कोरपना:कोरपना तालुक्यात अंतरगाव येथे
दिनांक 09/08/2023 ला, विश्व आदिवासी दिवस अंतरगाव बु. इथे जय सेवा मंडळ यांनी साजरा केला, कार्यक्रमाचे अध्यक्ष देवेंद्र गेडाम, उद्घाटक गावातील प्रथम नागरिक सरपंच निताताई वाघमारे , सह उदघटक, दिनेश पोळे, तसेच ग्रामपंचात सदश, प्रमोद पिंपलशेंडे, अमोल कळस्कर, प्रिय वडस्कर, मंगला सतघरे, सीमा गुरणुले, शारदा सुर, पोलीस पाटील नितीन मडावी, माजी त.मु. अध्यक्ष सुरेश कडस्कर, माझी पोलीस पाटील आनंदराव मडावी, आदिवासी सेवा मंडळ अध्यक्ष देवराव टेकाम आणि सर्व आदिवासी सेवा मंडळातील सदस्य हजर होते.
कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी आठ वाजता घेण्यात आली. त्यात वीर बाबुराव शेडमाके बिरसा मुंडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला हार चढवून मानवंदना देण्यात आला आणि, सूत्रसंचालन अनुज खेलुरकर यांनी केले आणि प्रास्ताविक शंकर पंधरे यांनी केले आणि सायंकाळी सात वाजता गावातून फेरी काढण्यात आली
