Home Breaking News Bhadravti taluka@ news • भद्रावतीच्या व्हर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन!

Bhadravti taluka@ news • भद्रावतीच्या व्हर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन!

418

Bhadravti taluka@ news
• भद्रावतीच्या व्हर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

भद्रावती:१५ऑगस्ट दिना निमित्त भद्रावतीच्या स्थानिक व्हर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने शनिवार दि.१२ऑगस्टला शालेय विद्यार्थ्यांसाठी एका चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती उपरोक्त सोसायटीच्या संस्थापक व अध्यक्ष कु.किरण विजय साळवी यांनी आज भद्रावती मुक्कामी या प्रतिनिधीस एका भेटी दरम्यान दिली. ही चित्रकला स्पर्धा भद्रावती तालुक्यातील पिपरी देशमुख येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत होत असून ही स्पर्धा पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आली आहे.

या स्पर्धेत विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे या शाळेचे मुख्याध्यापक संजय मासळकर यांनी सांगितले.स्पर्धेत उत्कृष्टरित्या चित्र रेखाटणा-या विजेत्यांना या वेळी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह बहाल करण्यात येणार आहे.

दरम्यान या स्पर्धेची परीक्षक म्हणून क्षितीज शिवरकर हे आपली जबाबदारी पार पाडणार आहे.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कलावती कोडापे, कल्याणी कामडे,बबन टेकाम ,पूजा टेकाम ,शिला कांबळे, शुभांगी मालेकर , कमल मेश्राम,चंद्रकला थेरे,ज्योसना खुटेमाटे,सुरेखा पाटील,पुष्पा नगराळे,अनिता कुमरे यांचेसह शाळेतील शिक्षक वृंद व कर्मचारी अथक परिश्रम घेत आहेत.

सामाजिक कार्यात नेहमीच चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावतीची व्हर्चुअस मल्टीपर्पज सोसायटी अग्रेसर राहिली आहे.विशेष म्हणजे उल्लेखनीय कामगिरी साठी या सोसायटीच्या अध्यक्ष कु.किरण साळवी यांना आज पावेतो अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे.