Ballarpur taluka@ news
• तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न
सुवर्ण भारत:किरण घाटे(उपसंपादक)
बल्लारपूर : क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर तालुका क्रीडा समिती, बल्लारपूर च्या अंतर्गत तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाली.
तालुका क्रीडा संकुल विसापुर, बल्लारपूर येथे झालेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन चंदन सिंह चंदेल माजी अध्यक्ष वन विकास महामंडळ यांचे हस्ते झाले. या वेळी माजी क्रीडा संयोजक जगदीश गुरपूडे, अशोक कांबळे, अरुण टोंगे, जूम्मन रीझवी, रोटरी क्लब बल्लारपूरचे अध्यक्ष राहुल वरू, प्रफुल चरपे, पंच उमेश सहारे,चेडे , प्रमोद रामिल्ला उपस्थित होते.
या स्पर्धेत अंडर १४,१७,१९वयोगटातील १६० विद्यार्थ्यांनी भाग घेतले होते. या प्रत्येक गटात पाच-पाच विद्यार्थीची निवड जिल्हा पातळी करिता करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन किशोर मोहूर्ले तालुका क्रीडा संयोजक बल्लारपूर यांच्या सहयोगाने पार पडले. यावेळी तालुक्यातील शाळेचे क्रीडा शिक्षक गुलाम अहमद, रोहित शर्मा, भाग्यश्री मेश्राम, रमेश नातरकी, योगिता भोयर, स्वप्निल डंबारे, प्रणिता मॅडम, प्रभुदास सर, शबाना मॅडम, मंजुषा मॅडम आदींची उपस्थिती सदर स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली.
