Home Breaking News Ghugus city @news •ताज बाबा उर्स बहुउद्देशीय संस्थेने काढलेल्या संंदलमध्ये आईस्क्रीम वाटप

Ghugus city @news •ताज बाबा उर्स बहुउद्देशीय संस्थेने काढलेल्या संंदलमध्ये आईस्क्रीम वाटप

613

Ghugus city @news
•ताज बाबा उर्स बहुउद्देशीय संस्थेने काढलेल्या संंदलमध्ये आईस्क्रीम वाटप

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस: शिवनगर संकुलातून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ताज बाबा उर्स बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने भव्य संदलचे आयोजन करण्यात आले होते.रविवार, 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता संदल शिवनगर येथून निघून शास्त्रीनगर, सुभाष नगर, गांधीनगर, राजीव रतन चौक छत्रपति शिवाजी चौक, बँक ऑफ इंडिया चौक, गांधी चौक मार्गे चांद सांवली दरगाह येथे पोहोचली.

ताज बाबा उर्स बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने काढण्यात आलेल्या संदल मध्ये मुस्लिम बांधव व इतर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.संदल मधी सहभागी बांधवाना उमेश गुप्ता तर्फे आईस्क्रीम वाटप करण्यात आले.

यावेळी उमेश गुप्ता,सुरज कन्नूर, राजू रामटेके, चंदू पलावार, रोहित घोरपडे, लड्डू सिलका, रोहित अरमुला, हर्षल खेवले आदी मोठ्या संख्येने बांधव उपस्थित होते.