Home Breaking News Chandrapur city@ news • आपच्या तिरंगा रॅलीने वेधले चंद्रपुरकरांचे लक्ष!

Chandrapur city@ news • आपच्या तिरंगा रॅलीने वेधले चंद्रपुरकरांचे लक्ष!

67

Chandrapur city@ news
• आपच्या तिरंगा रॅलीने वेधले चंद्रपुरकरांचे लक्ष!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातील 76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आम आदमी पार्टी चंद्रपूरच्या वतीने काल शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली.सदरहु रॅलीमुळे शहरात राजकीय शक्तीचे एकंदरीत प्रदर्शन दिसून आले.दरम्यान पक्ष बांधणीच्या विस्तारासाठी ही तिरंगा रॅली अत्यंत महत्त्वाची होती.असे आपच्या पदाधिका-यांनी म्हटले आहे.

भारत देश आपल्या स्वातंत्र्याचा 76 वा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. यानिमित्त आम आदमी पार्टीने चंद्रपूरात 15 ऑगस्ट 2023 ला तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते. स्थानिक जनता कॉलेज चौकात सकाळी 8:30 वाजता देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या बलिदानासाठी आदर व्यक्त करण्यात आला. ध्वजारोहण सोहळा पार पडल्यानंतर तिरंगा रॅली निघाली.
अभिमानाने तिरंगा फडकवताना स्वातंत्र्यप्राप्तीसाठी असंख्य व्यक्तींनी केलेल्या बलिदानाची नागरिकांना आठवण करून देणारी ही भव्य रॅली एकतेचे प्रतीक बनली. देशभक्तीची भावना घेऊन विविधता आणि एकात्मतेचे दर्शन घडविणारी सदरहु रॅली शहराच्या मुख्य मार्गाने निघाली. “बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो, ह्या जयघोषना या वेळी दुमदुमल्या ! रॅलीत आम आदमी पार्टीचे सुनील मुसळे,मयूर राईकवार, योगेश गोखरे,योगेश मुऱ्हेकर ,अधिवक्ता सुनीता पाटील अधिवक्ता तबसुम्म ,रवी पप्पुलवार, ज्योती बाबरे, प्राध्यापक नागेश्वर गंडलेवार अमित बोरकर,दिपक बेरसेट्टीवर,मधुकर साखरकर,राजू कुडे,सुजित चेटगुलवार,नासिर भाई शेख,नागसेन लाभाने,जितेंद्रकुमार भाटिया,संतोष दोरखंडे,बादल खोटे,सैयद अशरफ,विजेंद्र सिंह गिल,लक्ष्मण पाटील,नमिता पाटील.प्रशांत रामटेके,दिलीप चाहांदे,रोशन मुढळकर,मृणाल पाटील,प्रणाली पाटील,शेख अशरफ कुरेशी,आरिफा कुरेशी,माया दूपारे,मंगला मुके
लिलाबाई नवघरे ,जास्मिन शेख ,पिके बुद्ध वाल, मीना पोटफोडे, प्रशांत रामटेके, स्वाती डोंगरे,भीमराव मेंढे ,विकास खाडे ,संतोष सलामे,अनुप नाईक , डॉक्टर देवेंद्र अहिर, गिरीश सोमलकर, शुभम देवगडे, युगल अलोने , अजिंक्य अंगुलवार, जयप्रकाश, कार्तिक बुरकुटे, अनिकेत लडके ,संदीप ठमेकर, कुणाल बोरकुटे ,नागसेन लभाने तथा अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

रॅलीने चंद्रपूरकरांचे लक्ष वेधून घेतले होते.आम आदमी पार्टीने चंद्रपूरमध्ये संघटन मजबूत करण्यासाठी आणि तळागाळात पोहोचण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे फलित या रॅलीच्या निमित्ताने काल दिसून आले.
पक्षाच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी तिरंगा यात्रेला संबोधित करताना लोकशाही मूल्ये टिकवून ठेवण्यासाठी, उत्तम प्रशासन सुनिश्चित करण्यासाठी आणि सामान्य माणसाचे हित जपण्यासाठी पक्षाला सत्तेत येण्याची संधी द्यावी असे आवाहन या वेळी केले.