Chandrapur city@ news
• व्हर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीची चित्रकला स्पर्धा
•स्पर्धेतील उत्कृष्ट व मनोवेधक चित्रे रेखाटणां-या विजेत्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह बहाल!
✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक
चंद्रपूर:१५ ऑगस्ट दिना निमित्त भद्रावतीच्या स्थानिक व्हर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने शनिवार दि.१२ऑगस्टला शालेय विद्यार्थ्यांसाठी एका चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .दरम्यान या आयोजित स्पर्धेला शेकडों शालेय विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.ही स्पर्धा उपरोक्त सोसायटीच्या संस्थापक व अध्यक्ष कु.किरण विजय साळवी यांनी आयोजित केली होती.सदरहु चित्रकला स्पर्धा भद्रावती तालुक्यातील पिपरी देशमुख येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत घेण्यात आली .ही स्पर्धा पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आली होती.वरील स्पर्धेत विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.स्पर्धेत उत्कृष्टरित्या चित्र रेखाटणां-या विजेत्यांना स्वातंत्र्य दिनी १५ ऑगस्टला एका भव्य कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह बहाल करण्यात आली.
स्पर्धेची परीक्षक म्हणून क्षितीज शिवरकर यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली होती. कार्यक्रमाला प्रामुख्याने मुख्याध्यापक संजय मासळकर,सरपंच अर्चना नांदे , उपसरपंच पकंज खंडाळे ,माजी सरपंच संदीप खुटेमाटे,माजी सैनिक भारत डोंगे ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कृष्णा बर्वे ,ग्राम सेविका सीमा नितनवरे, अनिल भगत , शिवानी काकडे,साधना उपगंल्वार, शशिकांत रामटेके, संध्या कामतवार, कला कोडापे , चंद्रकला खुटेमाटे, ज्योत्स्ना खुटेमाटे,कमल मेश्राम,शुभांगी मालेकर,वैभव डांगे,अनिता कुमरे,माया कन्नाके आदीं उपस्थित होते.भद्रावतीच्या व्हर्चुअस मल्टीपर्पज सोसायटी तर्फे आयोजित केलेल्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असे कु.किरण विजय साळवी यांनी आज सांगितले.दरम्यान साळवी यांचेसह शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकवृंदांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.
