Home Breaking News Bhadrawati taluka@news डाॅ.आंबेडकर मेमोरियल हायस्कूल मध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

Bhadrawati taluka@news डाॅ.आंबेडकर मेमोरियल हायस्कूल मध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

272

Bhadrawati taluka@news
डाॅ.आंबेडकर मेमोरियल हायस्कूल मध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

✍️मनोज मोडक
सुवर्ण भारत:ता.प्रतिनिधी,भद्रावती

भद्रावती – डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच स्वप्न पुर्ण करण्यासाठी डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी गरिब व गरजू लोकांच्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेता येईल या करिता 1976 ला फ्रेंड्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून डाॅ आंबेडकर कॉन्व्हेंट ची भद्रावतीत पहिली सुरुवात केली असून 47 वर्ष पूर्ण झाले आहे.आज डाॅ आंबेडकर मेमोरियल हायस्कूल च्या नावाने प्रसिद्ध आहे.या हायस्कूल मधुन शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात उच्चपदस्थ झालेले आहेत.
स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी माजी विद्यार्थी Ad.मिलिंद रायपुरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की आजच्या स्पर्धात्मक युगात बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित या हायस्कूल ला प्रगती पथावर नेण्याकरिता समाजातील सक्षम लोकांचे योगदान गरजेचे आहे.
सदर कार्यक्रमात देश भक्तीवर सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आला.या प्रसंगी कार्यक्रमात प्राचार्य मिलिंद वाघमारे सह प्रमुख पाहुणे Ad.मिलिंद रायपुरे,मनोज मोडक,Ad.राजरत्न पथाडे,अजय पाटील सर,दानव सर,संस्थेचे सचिव गेडाम सर आणि संस्थेचे सदस्य,शिक्षक -शिक्षिका सह विद्यार्थ्यी उपस्थित होते.