Home Breaking News Ballarpur city @news • रेल्वेच्या दोनशे कंत्राटी कामगारांना मिळाला न्याय ...

Ballarpur city @news • रेल्वेच्या दोनशे कंत्राटी कामगारांना मिळाला न्याय • राजू झोडेंच्या प्रयत्नाला आले यश • कामगारांना मिळाले हक्काचे वेतन!

100

Ballarpur city @news
• रेल्वेच्या दोनशे कंत्राटी कामगारांना मिळाला न्याय
• राजू झोडेंच्या प्रयत्नाला आले यश
• कामगारांना मिळाले हक्काचे वेतन!

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

बल्लारपुर:रेल्वेच्या 200 कंत्राटी कामगारांना उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी प्रयत्न करुन हक्काचे वेतन मिळवून दिले आहे .अर्थातच एक प्रकारे त्या कामगारांना न्याय मिळाला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील विरुर स्टेशन, राजुरा, तेलंगणा राज्यातील बोलमपल्लीसह इतर ठिकाणांहून रेल्वेच्या कामासाठी अंदाजे 200 कंत्राटी कामगारांना उत्तर प्रदेशातील ललीतपुर येथील कामगारांना राजस्थानच्या पेटी ठेकेदारानी संध्या नावाच्या कंपनीच्या कामावर नेले.मात्र मागील दोन महिन्यांपासून या कामगारांचे वेतन कंपनीने दिले नव्हते.अशातच हे कामगार बल्लारपूर रेल्वे स्थानकावर उतरून थेट पोलीस ठाण्यात आले.याची माहिती उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे व स्थानिक जंतर मंतर ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी तात्काळ या सर्व कामगारांची आपबिती ऐकून घेत त्यांच्या भोजनाची सोय केली.यावेळी बल्लारपूरचे पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा करून नंतर कंपनीच्या व्यवस्थापकाशी चर्चा केली.

उलगुलान संघटनेचे अध्यक्ष झोडे यांनी कंपनी व्यवस्थापनाची या वेळी चांगलीच कान उघडणी केली नंतर कंपनी व्यवस्थापनाने तात्काळ जवळपास 200 कामगारांना वेतन देण्याचे मान्य केले . सध्या सर्व कामगारांना वेतन मिळाले. कामगारांनी राजू झोडे,नरेश डोंगरे, कर्मवीर सौदागर, श्याम झिलपे,प्रशांत रणदिवे,अनिल सुखदेवे,गोकूल भालेराव,नंदलाल वर्मा,छुटन निषाद,छगल शाहु, पंचशील तामगाडगे जंतर मंतर ग्रुपच्या पदाधिकारी वर्गांचे आभार मानले.दरम्यान हे सर्व कामगार स्वगावी रवाना झाले असल्याचे राजू झोडे यांनी आज दुपारी या प्रतिनिधीस सांगितले.