Home Breaking News Bhadrawati taluka@news भद्रावतीत आंबेडकरी विचार संघर्ष संघटने चा तहसील कार्यालयावर भव्य...

Bhadrawati taluka@news भद्रावतीत आंबेडकरी विचार संघर्ष संघटने चा तहसील कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा

719

Bhadrawati taluka@news
भद्रावतीत आंबेडकरी विचार संघर्ष संघटने चा तहसील कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा

✍️मनोज मोडक
सुवर्ण भारत:तालुका प्रतिनिधि,भद्रावती

भद्रावती-देशात व राज्यात आदिवासीं,दलित, बौद्ध, बहुजन, अल्पसंख्याक बांधवांवर धर्मांध शक्तीकडून अन्याय-अत्याचार सतत वाढत आहे. त्यात प्रामुख्याने भिम-आर्मी चे संस्थापक चंद्रशेखर आझाद वरील प्राणघातक हल्ला,आदिवासीं बांधवांवर घडवून आणलेला लघवी कांड,मणिपूर मधील महिलांची काढण्यात आलेली नग्न धिंड,नांदेड येथील अक्षय भालेराव हत्याकांड,बिड मध्ये पोलीस कोठडीत झालेले जहिर खान हत्या प्रकरण, सांगली जिल्ह्य़ातील बेगड गावातील डाॅ.आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या स्वागत कमानीचा वाद,संभाजी भिडे यांचे राष्ट्रध्वज व महापुरुषांवरील वादग्रस्त आणि देशविघातक विधाने इत्यादीं विषयांवर कठोर कारवाई करण्यात कुचकामी ठरलेल्या केंद्र व राज्य सरकारचा जाहीर निषेध करण्या साठी भद्रावती तालुक्यातील तमाम संविधान प्रेमींनी एकत्रित येऊन, आंबेडकरी विचार संघर्ष संघटन, भद्रावती तर्फे बुद्ध लेणी प्रवेशद्वार ते तहसील कार्यालय पर्यंत काढण्यात आलेल्या भव्य मोर्चात बौद्ध समाज संघटन,माळी समाज संघटन,गोंडी धर्मीय एकता संघटन,हजरत टिपु सुल्तान युवा फाऊंडेशन,भद्रावती सह हजारोंच्या संख्येत सहभागी होऊन केंद्र व राज्य सरकार चा निषेध असो..अशा घोषणा करीत तहसील कार्यालय येथे पोहोचल्यावर मा.तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.