Home Breaking News Bhadrawati taluka@news •विवेकानंद महाविद्यालयात श्री.अरविंद जीवन व कार्य या विषयावरील...

Bhadrawati taluka@news •विवेकानंद महाविद्यालयात श्री.अरविंद जीवन व कार्य या विषयावरील व्याख्यान संपन्न

375

Bhadrawati taluka@news

•विवेकानंद महाविद्यालयात श्री.अरविंद जीवन व कार्य या विषयावरील व्याख्यान संपन्न

✍️मनोज मोडक
सुवर्ण भारत:ता. प्रतिनिधी,भद्रावती

भद्रावती : महायोगी श्री. अरविंद यांची १५१ वी जन्मतिथी साजरी करण्यात आली. श्री अरविंदाचा जन्म १५ ऑगस्ट १८७२ ला झाला. आणि भारताला स्वातंत्र्य सुध्दा १५ ऑगस्टलाच मिळाले हा योगायोग होता की परमेश्वराचे नियोजन होते ते सांगणे कठीण आहे . ते असामान्य बुद्धिमान होते. त्यांना अनेक भाषांचे ज्ञान होते. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत उघडपणे सामील झाले. त्यांना राजद्रोहाच्या आरोपावरून अटक करण्यात आली. कारागृहात असताना त्यांना अनेक आध्यात्मिक अनुभव आले.
त्यामुळे त्यांच्या भावी जीवनाचा प्रवाह पूर्णतः बदलून गेला याच सुमारास त्यांना ईश्वर दर्शन झाले त्यांना आंतरिक आदेश झाल्यामुळे राजकीय क्षेत्रातून ते निवृत्त झाले व पांडेंचेरी येथे येऊन केवळ आध्यात्मिक साधनेमध्ये मग्न झाले असे विचार कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय पालक -मित्र मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम मत्ते यांनी विवेकानंद महाविद्यालय भद्रावती येथील श्री माँ सभागृहात व्यक्त केले. श्री अरविंद हे भविष्यकाळाचे संदेशदूत आहे .

ईश्वरी संकल्पाद्वारे आखण्यात आलेले तेजोमय भारताचे भविष्य प्रत्यक्षात उतरविण्याचा मार्ग ते आपल्याला दाखवीत आहे. भारताच्या उज्वल भविष्यासाठी आणि मानवतेच्या प्रगतीसाठी श्री अरविंदाचे विचार फार अमूल्य आहे असे विचार प्रसंगाचे औचित्य साधून विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य तथा श्री अरविंद सोसायटी सेंटरचे अध्यक्ष डॉ. नामदेव उमाटे यांनी श्री. अरविंद यांचे जीवन व कार्य यावर अभ्यासपूर्ण भाषणाने उपस्थितांची मने जिंकून घेतली. कार्यक्रमाचे संचालन प्रा .अमोल ठाकरे, प्रास्ताविक चंपत आस्वले व आभार माधव कौरासे यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात श्री अरविंद यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली .
श्री अरविंद स्तवन आणि ध्यान साधना करून कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमास धनराज आस्वले, मधुकर बोडणे, वसंत वऱ्हाटे, सुदर्शन तणगुलवार, गोविंद ठाकरे, बाबाकर बिपटे, बी.के. उरकुंडे, बबन शंभळकर, वासुदेव ताजने, सुखदेव साठे, नागोबा बहादे, पंढरी गायकवाड,केशव ताजने नामदेव तिखट, दादा सोनटक्के, विठ्ठल ढवळे, डॉ. यशवंत घुमे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.