Bhadrawati taluka@news
• सीडीसीसी बँक शाखा भद्रावती अंतर्गत सभासदांना दुचाकी वाहन वितरण
• रविंद्र शिंदे यांच्या हस्ते टाकळी सेवा सहकारी संस्थेच्या सभासदांना दुचाकी प्रदान
• सुरक्षेच्या दृष्टीन दुचाकी गाडी चालवितांना न चुकता हेलमेटचा वापर करावा : रविंद्र शिंदे
✍️ मनोज मोडक
सुवर्ण भारत:तालुका प्रतिनिधि,भद्रावती
भद्रावती – चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. चंद्रपूर ही शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाते. बँकेचे ग्राहक, सेवा सहकारी संस्था, त्यांचे सभासद यांना कर्ज, शेतकऱ्यांना कर्ज वाटपात अग्रणी असून शुन्य एनपीए असलेली बँक म्हणून नावारुपास आलेली आहे. सीडीसीसी बँक शाखा भद्रावती अंतर्गत टाकळी सेवा सहकारी संस्था टाकळी यांच्या मार्फतीने मध्यम मुदती कर्जाच्या माध्यमातून सभासदांना दुचाकी वाहन वितरण करण्यात आले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. चंद्रपूर चे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक तसेच कर्ज समितीचे अध्यक्ष रविंद्र शिंदे यांच्या हस्ते सेवा सहकारी संस्था टाकळी सभासद गुणवंत सातपुते, देवराव आत्राम, बंडू उर्फ विठ्ठल आसेकर, प्रविण उपरे, संतोष लेडांगे व बबन मत्ते यांना एकुण पाच लाख नव्वद हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकी वाहन मध्यम मुदती कर्ज अंतर्गत टाकळी सेवा सहकारी संस्था टाकळी यांच्या मार्फत संस्थेच्या सहा सभासदांना वितरीत करण्यात आले.
सुरक्षेच्या दृष्टीने आपला परीवार आपली घरी वाट बघत असतो आणी सर्वानी न चुकता जेव्हाही आपण गाडी चालवणार तेव्हा अर्जावून हेलमेटचा वापर करावा अशा सुचना रविंद्र शिंदे यांनी दुचाकी लाभार्थी तसेच जनतेला याप्रसंगी दिला.
दुचाकी वितरण कार्यक्रमाला रविंद्र शिंदे यांच्या सोबतच सीडीसीसी बँक शाखा भद्रावतीचे शाखा व्यवस्थापक मधुसुधन वडगावकर, निरीक्षक राजू बारहाते, टाकळी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रविण बल्की, उपाध्यक्ष विलास सातपुते, सचिव अक्षय क्षिरसागर, जेना उपसरपंच हरीचंद्र आसुटकर, भद्रावती विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अरुण घुगल तसेच सीडीसीसी बँकेचे कर्मचारी व प्रतिष्ठीत नागरीक दुचाकी वाहन वितरण सोहळयाला उपस्थित होते.