Home Breaking News गुरुदेव सेवा प्रार्थना योग समिती व गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने स्वातंत्र्य दिन...

गुरुदेव सेवा प्रार्थना योग समिती व गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने स्वातंत्र्य दिन थाटात साजरा

326

• गुरुदेव सेवा प्रार्थना योग समिती व गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने स्वातंत्र्य दिन थाटात साजरा!

सुवर्ण भारत:किरण घाटे(उपसंपादक)

चंद्रपूर:15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही गुरुदेव सेवा प्रार्थना मंदिर योग समिती व गुरुदेव सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुदेव प्रार्थना मंदिर तुकुम परिसरात
स्मिताजी रेभनकर व मोहन मसराम यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला.ध्वजारोहण कार्यक्रमाला सुभाष कासनगोटूवार,पूर्व नगर म.न.पा चंद्रपूर महिला पतंजली योग समितीच्या राज्य कार्यकारिणी सदस्या महाराष्ट्र पुर्वच्या स्मिता रेभनकर चंद्रपूर जिल्हा प्रभारी नसरीन शेख, कोषाध्यक्ष वंदना भूषणवार, तालुका प्रभारी प्रतिभा रोकडे,मंजुषा कासनगोटूवार, मोहनजी मसराम ,जिल्हा महामंत्री अपर्णा प्रविण चिडे, श्री गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष बबनराव अनमुलवार या शिवाय जिल्हा पदाधिकारी,तालुका पदाधिकारी,कार्यकर्तांगण, योग शिक्षिका, योग साधक-साधिका, गुरुदेव उपासक -उपासिका उपस्थित होते.

गिता जिवतोडे लता उपरे, लता जोगी,शीला आमडे, सुनंदा बल्की यांनी यावेळी देशभक्तीपर गीत गायले
नसरीन शेख यांनी देखील एक देश भक्ती गीत सादर केले.कार्यक्रमाचे संचालन शुभांगी अनमुलवार यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार सचिव गुरुदेव सेवा मंडळाचे सचिव रामराव धारणे यांनी मानले .सदरहु कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा महामंत्री अपर्णा चिडे आणि गुरुदेव सेवा मंडळ व योग कक्षा मधील सर्व टीमने अथक परिश्रम घेतले.