Ballarpur city@ news
• भाजपा अल्पसंख्यक मोर्चाच्या वतीने ताजबाग दर्ग्यावर चादर चढविली
सुवर्ण भारत: किरण घाटे(उपसंपादक)
बल्लारपूर :- हजरत सैय्यद बाबा ताजुद्दीन औलीया (र. तु.) यांच्या १०१ व्या उर्स निमित्त चंद्रपूर जिल्हा भाजपा अल्पसंख्यक मोर्चाच्या वतीने नागपूर येथील पवित्र ताजबाग दर्गा येथे चादर चढविण्यात आली. सर्वधर्मीयाचे श्रध्दास्थान असलेल्या पवित्रस्थळी महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी, जुनेद खान, ताजबाग ट्रस्टचे अध्यक्ष जनाब प्यारे जिया खान, सय्यद अन्सार भाई अमरावती, रमजान अन्सारी, चंद्रपूर जिल्हा भाजपा अल्पसंख्यक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शेख जुम्मन रिझवी, नागपूर जिल्हाचे हाजी दिलावर खान, बशीर भाई पाढरकवडा, चंद्रपूर महानगरचे अमीन शेख, जिल्हा महामंत्री शेख हुसैन, शेख निसार, शेख अजहर शेख युसूफ, शब्बीर खान, अब्दुल रज्जाक, जहीर खान, मुन्ना ईलटम आदींच्या उपस्थितीत सर्वधर्मसमभावाची प्रतीक असलेली चादर चढविण्यात आली. यावेळी सर्वांच्या सुख समृध्दीसाठी प्रार्थना करण्यात आली.
तत्पूर्वी भाजप अल्पसंख्यक मोर्चाच्या पश्चिम विदर्भ संम्मेलनामध्ये अल्पसंख्यक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यानी नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी यांचा शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. त्यानंतर उपस्थित पदाधिकाऱ्यांनी ताजबागला जावून दर्ग्यावर श्रध्दापूर्वक चादर चढवित बाबांच्या दर्ग्यावर माथा टेकला.