Home Breaking News Ghugus city@ news •लाइट्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड अंतर्गत लॉयड्स इनफिनिट फाउंडेशन...

Ghugus city@ news •लाइट्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड अंतर्गत लॉयड्स इनफिनिट फाउंडेशन तर्फे नगरपरिषदेला रुग्णवाहिका व शववाहिकेचे लोकार्पण

98

Ghugus city@ news
•लाइट्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड अंतर्गत लॉयड्स इनफिनिट फाउंडेशन तर्फे नगरपरिषदेला रुग्णवाहिका व शववाहिकेचे लोकार्पण

✍️पंकज रामटेके
सुवर्ण भारत:उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस :लाइट्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीने सी.एस.आर निधि अंतर्गत घुग्घुस नगर परिषदेला रुग्णवाहिका आणि शववाहिका समर्पित केलेली आहे. रुग्णवाहिका आणि शववाहिका चे लोकार्पण सोहळ्यासाठी जिल्हाधिकारी, चंद्रपूर विनय गौड़ा यांना कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले व त्यांच्या शुभहस्ते दि.२१ आगष्ट २०२३ ला रुग्णवाहिका आणि शववाहिकेचे नगर परिषद घुग्घुस येथे लोकार्पण करण्यात आले.

नगरपरिषदचे मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार यांनी आपले आभार व्यक्त केले आणि म्हनाले की, या दोन्ही वाहनांचा वापर घुग्घुसच्या व शेजारिल गावांच्या जनतेसाठी केला जाईल.

यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार, घुग्घुस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख सोबत कंपनीचे युनिट हेड संजयकुमार,कंपनीचे मानव संसाधन उपाध्यक्ष पवन मेश्राम,सीएसआर व्यवस्थापक तरुण केशवाणी, रतन मेडा, आदित्य सिंग, प्रमोद नाकाडे, जेष्ठ पत्रकार व नगरपरिषदेचे कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.