Home Breaking News Ballarpur city @news • नरेश मुंदडा यांची काँगेस परिवहन विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी ...

Ballarpur city @news • नरेश मुंदडा यांची काँगेस परिवहन विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ति

177

Ballarpur city @news
• नरेश मुंदडा यांची काँगेस परिवहन विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ति

✍️पारिश मेश्राम
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

बल्लारपूर:महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत परिवहन विभागाच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी माजी नगर सेवक नरेश शामसुंदर मुंदडा यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. झालेल्या निवडीबद्दल मुंदडा यांनी वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानले आहेत.
बल्लारपूर नगर पालिकेचे माजी नगर सेवक तथा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नरेश मुंदडा यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत परिवहन विभागाच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. मुंदडा यांची हि निवड महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस परिवहन विभागाचे अध्यक्ष डॉ. अमित मेश्राम आणि
महाराष्ट्र प्रदेश संघटक आकाश गवळी यांच्या वतीने करण्यात आली आहेत. या निवडीबद्दल
आमदार आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार प्रतिभाताई धानोरकर या नेत्यांचे आभार मानले आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी आणि संधीच आपण सोनं करून दाखवू अशी भावना नरेश मुंदडा यांनी व्यक्त केली आहे. या निवडीबद्दल काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अब्दुल करीम शेख, घनश्याम मुलचंदाणी, डॉक्टर अनिल वाढाई. दिलीप माकोडे, डॉ. मधुकर बावणे, छाया मडावी, डॉ. रजनीताई हजारे, सुनंदा अत्राम, भास्कर माकोडे, देवेंद्र आर्य, दौलत बुंदेल, जयकरण बजगोती, दिपक धोपटे, एम. व्यंकटेश बालबहिरय्या, नरसिंग रेब्बावार, चेतन गेडाम, विनोद आत्राम, इस्माईल धकवाला नाना बुंदेल, डेव्हिड कामपेल्ली, आनंद विरय्या यांनी अभिनंदन केले जाते.