Home Breaking News Bhadrawati taluka@news • नव्याने लागु करण्यात आलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणावर...

Bhadrawati taluka@news • नव्याने लागु करण्यात आलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणावर चर्चासत्र संपन्न

188

Bhadrawati taluka@news

• नव्याने लागु करण्यात आलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणावर चर्चासत्र संपन्न

✍️ मनोज मोडक
सुवर्ण भारत :तालुका प्रतिनिधी,भद्रावती

भद्रावतीत- महाराष्ट्रात नव्याने लागु करण्यात आलेले “राष्ट्रीय शिक्षण धोरन २०२० हे SC,ST,OBC ,शोषित,पिडीत,ग्रामीन भावी पिढ्यांसाठी हितकारक कि अहितकारक” या विषयावर मा.आयु. प्रभाकर डोंगरे सर यांनी चर्चा सत्राचे आयोजन बुद्ध विहार पंचशील नगर,भद्रावती येथे केले.
चर्चासत्राला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले वरिष्ठ विधितज्ञ ॲड. गुणरत्न रामटेके सर व प्रदीपजी गायकवाड सर,समता सैनिक दल, नागपुर यांनी उपस्थितांना अभ्यास पूर्ण मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमात समता सैनिक दल,भद्रावती चे मार्शल प्रा.अजय दहेगांवकर,मार्शल नरेंद्र भगत सर,मार्शल राज दुर्गे सर,मार्शल नरेश जांभुळकर सर,मार्शल किशोर ढोक सर,मार्शल जयभीम भगत सर,अशोक जवादे सर,नामदेव रामटेके सर,मुनेश्वर गौरकार व
परिसरातील बुद्धिजीवी महिला व पुरुष उपस्थित होते.
नव्यानेच लागू करण्यात आलेले राष्ट्रीय शिक्षण धोरण हे येणाऱ्या भावी पिढयां साठी भलामोठा आभाजगत स्वप्नरंजीत कृत्यांनी सजवलेला डोलाराच आहे.म्हणून उच्च शिक्षित वर्गातील लोकांनी सदर विषयाची चिकित्सक रित्या मांडणी करून भावी पिढ्यांचे भविष्य सुरक्षित राखण्याची गरज
असल्याचे मत मार्शल कमलाकर काटकर यांनी आभार प्रदर्शन करतांना व्यक्त करीत कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले.