Home Breaking News Chandrapur dist@ news • उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडेंची •जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी...

Chandrapur dist@ news • उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडेंची •जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी •चंद्रपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा!

60

Chandrapur dist@ news
• उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडेंची •जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
•चंद्रपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात 20 दिवसानंतर परत एकदा शुक्रवारी मध्यरात्री पासून मुसळधार पाऊस बरसला.अशातच अनेक नदी नाल्यांना पूर आला असून अनेक शेतकऱ्यांच्या उभ्या शेत पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर अनेकांच्या शेतात पाणी साचले असून धान, सोयाबीन, कापूस, भाजीपाला आदी संपूर्ण पीक पाण्याखाली गेले आहे .त्यातच शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या पीकांचे तात्काळ पंचनामे करून त्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी व जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्याकडे केली आहे.

जिल्ह्यातील चंद्रपूर,चिमूर, मूल, बल्लारपूर पोंभूर्णा, गोंडपिंपरी यासह अन्य तालुक्यात मागील तीन दिवस मुसळधार पाऊस बरसला. परिणामी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे व पुराचे पाणी जमा झाले तर अनेक शेतकऱ्यांचे शेतपीके पाण्याखाली गेले असून प्रचंड नुकसान झाले आहे.महागडे औषध फवारणी तसेच मजुरी सुद्धा वाया गेली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे, त्यामुळे नुकसानग्रस्त शेतपीकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी या शिवाय जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.