Ghugus city@ news
• घुग्घुस पोलिस ठाण्यातर्फे मेरी माटी मेरा देश उपक्रम
✍️ पंकज रामटेके
सुवर्ण भारत:उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
घुग्घुस : पोलिस ठाण्यातर्फे मंगळवार, २२ ऑगस्ट रोजी सकाळी मेरी माटी मेरा देश उपक्रम राबविण्यात आला.
जनता कॉन्व्हेट घुग्घुस शाळेच्या विद्यार्थ्यांना पोलिस ठाण्यात तिरंगा झेंडे देण्यात आले.
चंद्रपूर पोलिस दलाच्या बँड पथकाने देशभक्ती गीत सादर केले.
मेरी माटी मेरा देश उपक्रमा अंतर्गत घुग्घुस पोलिस ठाण्यातून मिरवणूक काढण्यात आली. गांधी चौकात बँड पथकाने देशभक्ती गीत सादर केले. गांधी चौक मार्गे मार्गक्रमण करीत पोलिस ठाण्यात मिरवणूकीचे समापन करण्यात आले.
मिरवणुकीत ठाणेदार आसिफराजा शेख, माजी जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, सहा. पो. नि. प्रशांत साखरे, सुहास विधाते, दिनेश वाकडे, गजानन झाडे, जनता कॉन्व्हेट घुग्घुस शाळेचे विनय बोढे, कीर्ती खैरे, निशा रामटेके, स्वाती बुच्चे, सुनंदा बावणे, मीनाक्षी ठोंबरे, शिवानी पुनगंटी, जमुना मादरवार, धनलक्ष्मी पांडे व मोठया संख्येत विद्यार्थी सहभागी झाले होते.






