Home Breaking News Chimur taluka@ news •हम है साथ साथ …! •असं म्हणत त्यांनी घेतली...

Chimur taluka@ news •हम है साथ साथ …! •असं म्हणत त्यांनी घेतली विवाहबद्ध होण्यासाठी नेरी तंमुसकडे धाव! •अखेर प्रेमीयुगल झाले विवाहबद्ध!

225

Chimur taluka@ news
•हम है साथ साथ …!
•असं म्हणत त्यांनी घेतली विवाहबद्ध होण्यासाठी नेरी तंमुसकडे धाव!
•अखेर प्रेमीयुगल झाले विवाहबद्ध!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

नेरी:चिमुर तालुक्यातील नेरी येथील महात्मा गांधी गाव तंटामुक्त समितीने आज दि २४ ऑगष्टला ग्रामपंचायतीच्या प्रांगणात एका आंतरजातीय प्रेमयुगुलांचा विवाह लावून दिला.

या प्रेम विवाहातील तरुणीचे नाव कु.आचल पदमाकर पोहाणे असून ती वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील सिरासगाव येथील मुळ रहीवाशी आहे.तीचे वय १८ वर्षाचे पूर्ण झालेले असून तीचे शिक्षण १२ वी पर्यंत झाले आहे.तर या प्रेमकहाणीतील प्रेम विराचे नांव विशाल भानुदास सुरजुसे असून त्याचे वय अवघ्या २२वर्षाचे असल्याचे समजते.तो हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर तालुक्यातील गाडेगांव येथील मूळ रहिवाशी आहे.त्याचे शिक्षण बी.ए .मराठी पर्यंत झाल्याचे कळते.

प्रेमिका आचल व प्रियकर विशाल यांचे गेल्या तीन वर्षांपूर्वी प्रेमाचे सुत जुळले होते.नंतर ते प्रेम बहरत गेले . प्रेमाचे रुपांतर लग्नात व्हावे व सुखी संसार थाटावा असे दोघांचे स्वप्न होते.आज साक्षीदारांच्या समक्ष त्यांचे स्वप्न पूर्णत्वास गेले . प्रेमात गुरफटलेल्या मुली कडील घरच्या मंडळींनी या विवाहास कडाडून विरोध केला होता.पण प्रेमाच्या आणाभाका घेतलेल्या व आपल्या लाडल्या प्रियकरास लग्नाचे वचन दिल्यामुळे कशाची ही पर्वा न करता विवाह करण्याचा निर्णय स्वता आचलने घेतला.

प्रियकराची मावशी चिमूर तालुक्यातील नेरी परिसरात राहते. त्या दोघांनी नेरी गाठली. नंतर महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीकडे आज धाव घेतली व विवाह लावुन देण्यासाठी‌ त्यांनी रितसर अर्ज सादर केला.

तंमुस समितीने अर्जाची तपासणी करून वया सबंधी बारकावे लक्षात घेतले व समिती अध्यक्षा़च्या परवानगीने समितीच्या पुढाकारातून हा विवाह लावुन देण्याचा निर्णय घेतला .शेवटी प्रेमी युगल आज विवाहबद्ध झाले.

हिंदु रिती रिवाजानुसार ग्रामपंचायत कर्मचारी घनश्याम लोथे यांनी माईकवर आपल्या मधूर आवाजात आज मंगलाष्टके म्हटली. या विवाहाला तंमुसचे अध्यक्ष हरिदास चांदेकर ग्रामविकास अधिकारी धवने सरपंच रेखा नानाजी पिसे,अभिजित कामडी,पिंटु खाटीक, रूस्तमखाँ पठाण,चंद्रभान कामडी,गंगा विठ्ठल कामडी, सत्यभामा नारायण कामडी , संजय नागदेवते ,डाॅ.रमेश राऊत, रामचंद्र कामडी ,प्रमोद परसराम झाडे,प्रभा चंद्रशेखर पोईनकर,यश पोईनकर ,ग्रा .प. कर्मचारी व तंमुस पदाधिकारी उपस्थित होते .