Home Breaking News Bramhpuri taluka@ news • ने.हि. कनिष्ठ महाविद्यालय ब्रम्हपुरी येथे “चंद्रयान-३ ची चंद्राला...

Bramhpuri taluka@ news • ने.हि. कनिष्ठ महाविद्यालय ब्रम्हपुरी येथे “चंद्रयान-३ ची चंद्राला गवसणी” कार्यक्रम उत्साहात संपन्न

46

Bramhpuri taluka@ news
• ने.हि. कनिष्ठ महाविद्यालय ब्रम्हपुरी येथे “चंद्रयान-३ ची चंद्राला गवसणी” कार्यक्रम उत्साहात संपन्न

✍️ रवि चामलवार
सुवर्ण भारत:तालुका प्रतिनिधी,
ब्रम्हपुरी

ब्रम्हपुरी:नुकतेच आपल्या भारताने इतिहास रचत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपला ‘चंद्रयान-३’ यान उतरवला आणि अशी कामगिरी करणारा भारत जगातील पहिला देश ठरला.भारताच्या या अलौकिक कामगिरीचे संपूर्ण जग कौतुक करत आहे. आपल्या विद्यार्थ्यांना ‘चंद्रयान-३’ या यशस्वी मोहिमेची माहिती मिळावी व विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा या उद्देशाने चंद्रपूर जिल्ह्यात कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर कला शाखेत नावलौकिक प्राप्त करणाऱ्या ने.हि. कनिष्ठ महाविद्यालय ब्रम्हपुरी येथे प्राचार्य जी.एन.रणदिवे सर यांच्या मार्गदर्शनात तथा उपप्राचार्य के.एम.नाईक सर व पर्यवेक्षक ए. डब्लू. नाकाडे सर यांच्या प्रोत्साहनाने “चंद्रयान-३ ची चंद्राला गवसणी” हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

सदर कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले विभाग प्रमुख तथा भूगोलतज्ञ प्रा. प्रकाश जिभकाटे सर यांनी चंद्रयान-३ च्या लॉंचिंग ते सॉफ्ट लँडिंग पर्यंतच्या यशस्वी प्रवासावर भाष्य करतांना चंद्रयान-३ या मोहिमेसाठी २३ऑगस्ट या तारखेच्या निश्चितेची पार्श्वभूमी , चंद्रयान-३ या मोहिमेचे उद्दिष्टे, लँडर व रोव्हर च्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभागाचे होणारे अन्वेषण, या मोहिमेत लँडर, रोव्हर, ऑर्बिटर , सोलर पॅनल इ. चा होणार उपयोग, चंद्रयान- ३ मोहिमेसाठी आलेला खर्च इ.अनेक बाबींवर प्रकाश टाकला.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.डॉ पंकज बेंदेवार यांनी केले; तर प्रा.कु. नितू खाडीलकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी करण बनसोड, गौरव बर्लावार, कु.रागिना नान्हे, कु.प्राजली राऊत, दौलत गहाणे इ. विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.