Home Breaking News Bhadrawati taluka@news प्रबोधन विचार मंच आणि युवा मंच तर्फे गुणवंत विद्यार्थी...

Bhadrawati taluka@news प्रबोधन विचार मंच आणि युवा मंच तर्फे गुणवंत विद्यार्थी सन्मान आणि करियर मार्गदर्शनाचे आयोजन

67

Bhadrawati taluka@news
• प्रबोधन विचार मंच आणि युवा मंच तर्फे गुणवंत विद्यार्थी सन्मान आणि करियर मार्गदर्शनाचे आयोजन

✍️मनोज मोडक
सुवर्ण भारत :तालुका प्रतिनिधी,भद्रावती

चंद्रपूर/भद्रावती-
प्रबोधन विचार मंच आणि युवा मंच तर्फे दिनांक २७ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११ वाजता डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, रामाला तलाव रोड, चंद्रपूर. येथे प्रबोधन तथा गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान कार्यक्रम आयोजीत करण्यात आलेला आहे..

या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणुन डॉ. चेतन खुटेमाते, प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ व मा. मूजव्वर अली, सायबर हायजिन प्रोटेक्शन, सायबर पोलीस स्टेशन, चंद्रपूर हे मार्गर्शन करतील….

सोबतच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारतसेच होतकरू आणि हुशार विद्यार्थ्यांना स्कुल बॅग सोबत शालेय साहित्य वाटप करण्यात येणार आहे ….

कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून सुधाकर अडबाले आमदार विधान परिषद महाराष्ट्र, विशेष अतिथी म्हणून अधिक्षक अभियंता महावितरण चंद्रपूर मा. इंजी. संध्या चिवंडे, प्रसिध्द बधिरिकरण तज्ञ मा. डॉ. प्रवीण डोंगरे, हृदय रोग व मधुमेह तज्ञ मा. डॉ. अमित ढवस व संचालिका इनरीच इंग्लिश मिडीयम स्कूल चंद्रपूर मा. वनिता खडतर उपस्थित राहतील.

प्रबोधन विचार मंच आणि युवा मंच चे अंतिम ध्येय म्हणजे “संविधान जागृती, संविधानाचे रक्षण, संविधानाची १०० टक्के अंमलबजावणी आणि महापुरुषांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करणे हेच आहे.” हाच उद्देश ठेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.