Home कृषी Chimur taluka @news • प्रियकर नेरीचा तर प्रेयसी नवरगांवची! •...

Chimur taluka @news • प्रियकर नेरीचा तर प्रेयसी नवरगांवची! • आकाश पोईनकर -मीनाक्षी शेंडेचा पार पडला नेरीत प्रेम विवाह! •तंटा मुक्त समितीचा पुढाकार !

358

Chimur taluka @news
• प्रियकर नेरीचा तर प्रेयसी नवरगांवची!
•आकाश पोईनकर -मीनाक्षी शेंडेचा पार पडला नेरीत प्रेम विवाह!
•तंटा मुक्त समितीचा पुढाकार !

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चिमूर:दोन दिवसांपूर्वीच एका प्रेमीयुगुलांचा प्रेमविवाह पार पडल्या नंतर आज परत चिमूर तालुक्यातील नेरी या गावी एका प्रेमी युगुलचा प्रेमविवाह पार पडल्याचे वृत्त आहे.
विवाहबध्द झालेल्या या तरुणीचे नाव मीनाक्षी सुधाकर शेंडे असून तीचे मुळ गांव सिंदेवाही तालुक्यातील नवरगांव असल्याचे समजते तर प्रियकर हा नेरी येथील मुळ रहीवाशी आहे.

या दोघांचे गेल्या दोन वर्षापासून प्रेमसंबध होते .एकमेकांच्या भेटीतून त्यांचे प्रेम अधिक बहरत गेले .
साथ जिऐंगे साथ मरेंगे अशी दोघांनी मनाशी गाठ बांधली लग्न करण्याचा निर्णय घेतला.परंतू या लग्न कार्यास मुलीच्या आईवडिलांनी चक्क विरोध होता . प्रेमात गुरफटलेल्या तरुणीला चैन पडेना.शेवटी तिने प्रियकराच्या मदतीने नेरी महात्मा गांधी गाव तंटामुक्त समीतीकडे धाव घेतली तद्वतच आज शनिवार दि.२६ ऑगष्टला रितसर अर्ज सादर केला व विवाह लावुन देण्याची विनंती केली

तंमुस समितीने रितसर अर्जाची तपासणी करून वया संबधी शालेय कागदपत्रे तपासून घेतली. समिती अध्यक्षा़चे पूर्व परवानगीने व समिती सदस्यांच्या पुढाकारातून आज हा लग्न सोहळा साक्षीदारासमक्ष पार पडला.

हिंदु पद्धतीनुसार ग्रामपंचायत कर्मचारी घनश्याम लोथे यांनी या वेळी मंगलाष्टके म्हटली.

या विवाहाला तंमुसचे अध्यक्ष हरिदास चांदेकर
सरपंच रेखा नानाजी पिसे,
समिती सदस्य पिंटु खाटीक, रूस्तमखाँ पठाण,चंद्रभान कामडी उपसरपंच,गंगा विठ्ठल कामडी,सत्यभामा नारायण कामडी, संगीता यशवंत वैरागडे,संजय नागदेवते, रामचंद्र कामडी, पंकज पाकमोडे, मोरेश्वर श्रीरामे,कन्हैया सिंग भौंड,राजु पोईनकर ,प्रमोद सामुसाकडे, शंकरराव पिसे , ग्रा. प .कर्मचारी,तंमुसचे अन्य पदाधिकारी ,सदस्यगण व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .एकाच आठवड्यात नेरीत दोन प्रेम विवाह पार पडले .हे विशेष!

यातील प्रेमी युगुल हे एकाच जातीचे असल्याचे अनेकांनी या प्रतिनिधीशी बोलताना आज सांगितले.