Home Breaking News Chandrapur dist@ news • तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी कलावती कोडापेंची नियुक्ती! •...

Chandrapur dist@ news • तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी कलावती कोडापेंची नियुक्ती! • किरण साळवी यांनी केले कोडापेंच्या नियुक्तीचे स्वागत !

197

Chandrapur dist@ news
• तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी कलावती कोडापेंची नियुक्ती!
• किरण साळवी यांनी केले कोडापेंच्या नियुक्तीचे स्वागत !

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

भद्रावती: तालुक्यातील पिपरी (दे)येथे शुक्रवार दि.२५ ऑगस्टला ग्रामसभा पार पडली .या ग्राम सभेत सर्वानुमते पिपरी दे.येथील तंटा मुक्ती समितीच्या अध्यक्षपदी कलावती अमोल कोडापे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.

आयोजित ग्रामसभेला सरपंच अर्चना नांदे, ग्रामसेविका सीमा नितनावरे, उपसरपंच पंकज खंडाळे,ग्राम पंचायत सदस्य संदीप कुटेमाटे, विजय मडावी, काजल चव्हाण पोलिस पाटील सुनिता ठोंबरे ,तलाठी अमित गौरकर अंगणवाडी सेविका चंद्रकला कुटेमाटे, आशा वर्कर सुमन कुटेमाटे ,संजय मासळकर आदिं उपस्थित होते.दरम्यान कलावती कोडापे यांच्या नियुक्तीचे स्वागत भद्रावतीच्या व्हर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीच्या संस्थापक व अध्यक्ष किरण साळवी यांनी केले आहे.
सामाजिक कार्यात कोडापे यांचे योगदान नेहमीच मोलाचे ठरले आहे.