Home Breaking News Bhadrawati taluka@news • शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मते यांचा भद्रावती तालुक्यात...

Bhadrawati taluka@news • शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मते यांचा भद्रावती तालुक्यात जनसंपर्क दौरा •विविध शासकीय योजनांची गावकऱ्यांना दिली माहिती

113

Bhadrawati taluka@news

• शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मते यांचा भद्रावती तालुक्यात जनसंपर्क दौरा
•विविध शासकीय योजनांची गावकऱ्यांना दिली माहिती

✍️मनोज मोडक
सुवर्ण भारत : तालुका प्रतिनिधी,भद्रावती

भद्रावती- पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख किरण पांडव यांच्या आदेशावरून नितीन मते शिवसेना जिल्हाप्रमुख यांनी कमलेश बारस्कर मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष मुंबई, आशिष ठेंगणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख तथा शहर प्रमुख भद्रावती, कमलकांत कळसकर शिवसेना तालुकाप्रमुख भद्रावती, सिंगल दीप पेंदाम उपतालुकाप्रमुख भद्रावती, यांचे सह भद्रावती तालुक्यातील ग्रामीण भागात दौरा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात राबविलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती तळागाळातल्या शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, युवक, महिला व जेष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व शिवसेना संघटना बळकट करण्यासाठी या दौऱ्याचे आयोजन भद्रावती तालुक्यातील बेलगाव, विसापूर व घोसरी या गावांमध्ये जाऊन स्वतः विविध योजनांची माहिती नागरिकांना दिली.
यामध्ये शेतकऱ्यांसाठी, युवकांसाठी, बेरोजगारांसाठी असलेल्या विविध योजना,तसेच वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता कशाप्रकारे करावी व कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असतात, त्याचप्रमाणे महिलांसाठी असलेल्या अनेक योजना, आदिवासी प्रवर्गासाठी असलेल्या योजना, अशा विविध योजनांची माहिती नितीन मत्ते यांनी या तीनही गावातील नागरिकांना दिली व शिवसेना पक्षाच्या गावागावात शाखा तयार करून बूथ प्रतिनिधी व शाखाप्रमुखांची नियुक्ती केली. यावेळी मारुती वांढरे शाखाप्रमुख बेलगाव, प्रविण बांदूरकर शाखाप्रमुख विसापूर, भानूदास पेंदाम शाखाप्रमुख घोसरी तीनही गावातील असंख्य नागरिक महिला ज्येष्ठ नागरिक प्रत्येक गावातील सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते