Home Breaking News Chandrapur dist@ news • बहीन भावाच्या अतुट प्रेमाचे प्रतिक असलेला रक्षाबंधन सण...

Chandrapur dist@ news • बहीन भावाच्या अतुट प्रेमाचे प्रतिक असलेला रक्षाबंधन सण चंद्रपूरात उत्साह व आनंदात साजरा!

283

Chandrapur dist@ news
• बहीन भावाच्या अतुट प्रेमाचे प्रतिक असलेला रक्षाबंधन सण चंद्रपूरात उत्साह व आनंदात साजरा!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:बहीण भावाचे प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण चंद्रपूरसह जिल्ह्यात उत्साह व आनंदात साजरा करण्यात आला.दरम्यान शहरातील श्री स्वामी समर्थ महिला व पुरुष योगा क्लासच्या वतीने चंद्रपूरातील निर्माण नगर तुकुम येथे आज मंगळवार दि. 30 ऑगस्टला सकाळी सात वाजता रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आयोजित कार्यक्रमाला 13 बहींणी व 13 भाऊ उपस्थित झाले होते. उपस्थित भावांनी आपल्या प्रेमाच्या बहिणींना रक्षाबंधन निमित्त या वेळी शुभेच्छा दिल्या.तत्दपूर्वि गुरुकुंज उद्यान मध्ये श्रमदानाचा एक कार्यक्रम घेण्यात आला.उपरोक्त कार्यक्रमाला श्री स्वामी समर्थ महिला व पुरुष योगा क्लासचे सर्व पदाधिकारी व सदस्यगण उपस्थित होते.अशी माहिती आज सुवर्णा लोखंडे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली.