Home Breaking News Ballarpur city@ news • बल्लारपूर शहरातील पशुवैद्यकीय रूग्णालय बनले समस्यांचे माहेरघर...

Ballarpur city@ news • बल्लारपूर शहरातील पशुवैद्यकीय रूग्णालय बनले समस्यांचे माहेरघर ! • आम आदमी पक्षाने दिले निवेदन! • सन 2019 पासून रुग्णालयातील वीज पुरवठाही खंडीत!

70

Ballarpur city@ news
• बल्लारपूर शहरातील पशुवैद्यकीय रूग्णालय बनले समस्यांचे माहेरघर !
• आम आदमी पक्षाने दिले निवेदन!
• सन 2019 पासून रुग्णालयातील वीज पुरवठाही खंडीत!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

बल्लारपुर:अख्ख्या विदर्भात ओद्यौगिक परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बल्लारपुर शहरातील पशुवैद्यकीय रूग्णालयात अनेक समस्या निर्माण झाल्या असून त्या समस्या तातडीने सुटाव्या या साठी आज आपचे शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांच्या मार्गदर्शनात व जिल्हा संघठनमंत्री प्रा. नागेश्वर गंडलेवार यांच्या उपस्थितीत शहर संघठन मंत्री रोहित जंगमवार यांच्या नेतृत्वात गटविकास अधिकारी यांच्या मार्फत चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना एक लेखी निवेदन देण्यात आले. शहरातील पशुवैद्यकीय रूग्णालयात सन 2019 पासून वीजपुरवठा खंडीत असून ते रूग्णालय बांधले गेले तेव्हापासूनच तेथे शौचालयाची सुविधा उपलब्ध नाही. पावसाळ्यात तर या ठिकाणी पाणी साचून तेथील परिसर चिखलमय होतो.

जनावरांच्या उपचारासाठी येणार्‍या नागरिकांसाठी तसेच जनावरांसाठी या रुग्णालयात पाण्याची सोय उपलब्ध नाही.अश्या एक नाही तर अनेक समस्यां या रुग्णालयात आहे दरम्यान आज आपने वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक लेखी निवेदन सादर केले.यावेळेस रोहित जंगमवार यांनी या समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात अशी मागणी केली .शौचालयाची सुविधा नसणे म्हणजे एकप्रकारे मानवी हक्कांचे उल्लंघन आहे असे त्यांनी बोलताना म्हटले आहे.निवेदन देताना आपचे उपाध्यक्ष अफजल अली, सहसचिव आशिष गेड़ाम, सोशल मिडीया प्रमुख सौरभ चौहान, युथ सहसंघठनमंत्री प्रज्वल चौधरी, वस्ती विभाग सचिव प्रज्योत डांगे आदिं पदाधिकारी उपस्थित होते.