Home Breaking News Chandrapur dist@ news •आयुष्याची लक्तरे घेऊन जगणाऱ्या वृद्धाची आर्त साद “घर देता...

Chandrapur dist@ news •आयुष्याची लक्तरे घेऊन जगणाऱ्या वृद्धाची आर्त साद “घर देता का घर” • ७० वर्षाच्या वृद्धाच्या नशीबी साधं छतही नाही • कागदपत्राची जुळवाजुळव करूनही ते झिझवताहेत कार्यालयाचे उंबरठे

168

Chandrapur dist@ news
•आयुष्याची लक्तरे घेऊन जगणाऱ्या वृद्धाची आर्त साद “घर देता का घर”
• ७० वर्षाच्या वृद्धाच्या नशीबी साधं छतही नाही

• कागदपत्राची जुळवाजुळव करूनही ते झिझवताहेत कार्यालयाचे उंबरठे

सुवर्ण भारत:रूपेश निमसरकार

चंद्रपूर:एकीकडे संपूर्ण भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे तर दुसरीकडे मात्र पोंभूर्णा तालुक्यातील जामखुर्द येथील दारिद्र्याची खापर घेऊन जर्जर आयुष्य जगणाऱ्या एका आदिवासी वृद्धाच्या नशीबी साधं छत सुद्धा नाही.आजही तो वृद्ध उपऱ्यासारखं जीवन जगतोय गावातल्या सामाजिक सभागृहाचा आडोसा घेऊन.शासन गाजावाजा करून गरजूंसाठी विविध योजनेतून घरकुलाचे योजना राबवित असलं तरी शासन स्तरावरून आजपर्यंत त्याला घर देण्याचे तर सोडाच पण त्याच्याप्रती साधी सहानुभूतीही दर्शवण्याची गरज शासनाला वाटली नाही.शासनाकडून होणारी हि थट्टा एका आदिवासी वृद्धाला सहन करावी लागत आहे.

पोंभूर्णा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जामखुर्द गावात ७० वर्षीय वृद्ध गजानन रुषी कुंभरे आपल्या मरतुकड्या आयुष्याचा रहाटगाडा चालवत आहे.त्यांना जगण्यासाठी वावभर सुद्धा शेती नाही.मातीचे लिपन असलेल्या खंडर भिंती म्हणजे त्याचा आशियाना.मागच्या वर्षी हा आशियाना अतिवृष्टीमुळे अर्धा कोसळला त्यामुळे तात्पुरती डागडुजी केली खरी मात्र या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे मातीचे लिपन असलेला त्याचा आशियाना आज पुर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.एकीकडे अठराविश्वे दारिद्र्य तर दुसरीकडे घरकुलाचे गाजर दाखवत शासनाकडून होत असलेली दिल्लगी यामुळे तो पुरता हवालदिल झाला आहे.अनेक वर्षांपासून त्यांनी घरकुलाच्या संबंधित कागदपत्रांची जमवाजमव करून कार्यालयाचे खेटरं घासले मात्र घराचे स्वप्न आजपर्यंत तरी पूर्ण झाले नाही.
वयाची ७० वर्ष पूर्ण झालेल्या गजानन कुंभरे आपल्या पडक्या घराजवळ तासनतास बसून घर देता का घर म्हणून आर्जव करतांना पाहून शासनाचे घरकुल योजनेचे सर्व दावे फोल असल्याचे चित्र स्पष्ट होतांना दिसते.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात एका ८० वर्षीय आदिवासी वृद्धाला आयुष्यभर गरिबीचे ओझे घेऊन डोक्यावर छत नसल्याने वणवण भटकण्याची वेळ आली आहे.गावातील सामाजिक सभागृहाच्या आडोश्यात त्यांनी आपली तात्पुरती राहण्याची सोय केली मात्र हक्काच्या घराचं स्वप्न मात्र अजूनही अधुराच राहिला आहे. शासन कधीतरी या उपेक्षित, वंचित,लाचार वृद्धाच्या डोक्यावर छत उभारणार काय हा प्रश्न गजाननच्या संदर्भात उपस्थित होत आहे.