Home Breaking News nagpur city @news • वारांगनांच्या वस्तीत रक्षाबंधन उत्साहात

nagpur city @news • वारांगनांच्या वस्तीत रक्षाबंधन उत्साहात

164

nagpur city @news
• वारांगनांच्या वस्तीत रक्षाबंधन उत्साहात

नागपूर : देहविक्रय करणाऱ्या वारांगनांच्या वस्तीत बुधवारी रक्षाबंधन सण उत्साहात साजरा झाला. त्यांनी एकमेकींना राखी बांधून आनंद साजरा केला. विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांनी अतिशय खंबीरपणे गंगाजमुना वस्तीतील महिलांच्या अधिकारांच्या रक्षणाची शपथ घेतली होती. तसेच स्वतःला त्यांचा भाऊ म्हणवून घेत येथे रक्षाबंधनाची परंपरा सुरू केली होती. त्यांनी सलग ५० वर्षे येथील महिलांकडून स्वतःच्या मनगटावर राखी बांधून घेतली होती.

२०१७ साली जांबुवंतराव धोटे यांचे निधन झाले. त्यांचा रक्षणकर्ता भाऊ आता राहिला नाही. मात्र त्यांची कन्या ज्वाला धोटे यांनी पुढाकार घेत तीन वर्षांपासून वडिलांची परंपरा सुरू ठेवली आहे. त्यांच्या पुढाकारानेच बुधवारी येथे रक्षाबंधन उत्साहात साजरे झाले. ज्वाला धोटे यांनी भाऊ म्हणून या महिलांकडून राखी बांधून घेतली.