Home Breaking News Mul taluka @news •नेफडो तर्फे पोलीस बांधवांना राखी बांधून व वृक्ष भेट...

Mul taluka @news •नेफडो तर्फे पोलीस बांधवांना राखी बांधून व वृक्ष भेट देऊन साजरा केला रक्षाबंधन कार्यक्रम

56

Mul taluka @news
•नेफडो तर्फे पोलीस बांधवांना राखी बांधून व वृक्ष भेट देऊन साजरा केला रक्षाबंधन कार्यक्रम

सुवर्ण भारत:किरण घाटे(उपसंपादक)

मूल (चंद्रपूर):नैसर्गिक पर्यावरण संस्था व मानवता विकास संस्थेतर्फे पोलीस स्टेशन मूल येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. माजी नगराध्यक्ष रत्नमाला भोयर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तेजस्विनी नागोसे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम साजरा झाला.
. नगराध्यक्ष यांनी राखीचे महत्व पटवून दिले तर तेजस्विनी नागोसे यांनी महिलांना रक्षाबंधन आणि राखी विषयी माहिती सांगून कृतज्ञता व्यक्त केली. पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांनी महिलांना मार्गदर्शन केले तर पोलीस सहायक निरीक्षक बनसोड यांनी चोरांपासून स्वतःचा बचाव कसा करायचा यावर मत व्यक्त केले. कार्यक्रमांमध्ये राखी बांधून वृक्ष भेट देण्यात आले. सूत्रसंचालन रत्ना चौधरी यांनी केले. यावेळी तेजस्विनी नागोसे महाराष्ट्र राज्य, रत्नमाला भोयर नागपूर विभाग सल्लागार उपाध्यक्षा रत्ना चौधरी, नागपूर विभाग अध्यक्षा ललिता मुस्कावार,नागपूर विभाग उपाध्यक्षा, श्रीरंग नागोसे नागपूर विभाग उपाध्यक्ष, अल्का राजमलवार चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्षा, नलिनी आडेपवार चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्षा महिला हिंसा प्रतिबंधक समिती,सुरेश मुस्कावार जिल्हा संघटक,कुमुदिनी भोयर मुल तालुका युवती अध्यक्षा,मुल तालुका संघटिका नंदा शेंडे, कल्पना मेश्राम, सुजाता बरडे, शशिकला गावतुरे, पुजा मोहुर्ले, वंदना वाकडे, कुशवाहा ,सुरपाम गोकुळकर, रेखा पोकळे,स्वाती वाडगुरे, विद्या कुकडे आदिं उपस्थित होते.